पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिली टी 20 मॅच सुरु आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिलनं (Shubhman Gill) भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं 74 धावांची सलामीची भागिदारी केली. यानंतर सूर्यकुमार यादवच्या अर्धशतक झळकावत भारताच्या धावांचा वेग कायम ठेवला. भारताच्या टी 20 संघाचा नियमित कॅप्टन म्हणून नेतृत्त्व करत असताना पहिल्याच मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनं 58 धावा केल्या. रिषभ पंतनं देखील 49  धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  भारतानं 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 213  धावा केल्या. श्रीलंकेपुढं विजयासाठी 214  धावांचं आव्हान भारतीय संघानं ठेवलं आहे.


सूर्यकुमार यादवचं अर्धशतक


सलामीवीर बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवनं 58  धावांची वादळी खेळी केली. सूर्यकुमार यादवचं कॅप्टन म्हणून हे तिसरं अर्धशतक ठरलं. सूर्यानं आतापर्यंत टी 20 मध्ये  20 अर्धशतकं केली आहेत. सूर्यकुमार यादवनं 8 चौकार आणि 4 षटकार मारले. सूर्यानं 26 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. त्यापूर्वी श्रीलंकेच्या खेळाडूंकडून मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा सूर्यकुमार यादवनं करुन घेतला.  हार्दिक पांड्या मोठी खेळ करण्यात अपयशी ठरला त्याला पथिरानानं बाद केलं. 


यशस्वी- शुभमनची आक्रमक सुरुवात


भारताला यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं आक्रमक सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वालनं 40 आणि शुभमन गिलनं 34 धावा केल्या. दोघांच्या खेळीमध्ये सर्वाधिक धावा या चौकार आणि षटकारांच्या होत्या. दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं पॉवरप्लेमध्ये 74 धावा केल्या.  यशस्वी जयस्वालनं दोन षटकार मारले, तर शुभमन गिलनं एक षटकार मारला.  सूर्यकुमार यादवनं 2  षटकार मारले. 


श्रींलकेचं खराब क्षेत्ररक्षण 


श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या फलंदाजांनी तो चुकीचा ठरवला. यामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलेलं खराब क्षेत्ररक्षण देखील कारणीभूत ठरलं. सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतचा कॅच श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी सोडला. हे खराब  क्षेत्ररक्षण श्रीलंकेला महागात पडलं. 


श्रीलंकेचा वेवगान गोलंदाज मथिशा पथिरानानं भारताच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्यानं सूर्यकुमार यादवला 58 धावांवर आणि हार्दिक पांड्याला 9 धावांवर बाद करत भारताच्या आक्रमक फलंदाजीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.  पथिरानानं रियान परागच्या रुपात भारताला तिसरा धक्का दिला. पथिरानानं रिषभ पंतला 49 धावांवर बाद करुन श्रीलंकेला आणखी एक यश मिळवून दिलं. 


भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच मॅचमध्ये भारतानं धावांचा डोंगर रचला. 


भारताचा संघ : 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग,रिषभ पंत (यष्टीरक्षक),  हार्दिक पंड्या ,  अक्षर पटेल,  रवी बिश्नोई,  अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंकेचा संघ : 


चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,मथिशा पाथिराना, एम. तिक्षणा, दिलशान मदूशंका


 संबंधित बातम्या :


IND vs SL : यशस्वी, शुभमन अन् सूर्याची वादळी बॅटिंग, 9 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण, श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं


IND vs SL : पहिलाच टॉस सूर्यकुमार याच्या विरोधात, श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात कुणाला स्थान?