पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL ) यांच्यातील पहिली टी 20 मॅच पल्लेकेले मध्ये सुरु झाली आहे. श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंकानं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानं भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या जोडीनं केली. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिलनं (Shubman Gill) पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. यामुळं भारताला चांगली सुरुवात मिळाली. भारतानं पॉवर प्लेमध्ये 1 विकेटवर 74 धावा केल्या. शुभमन गिल पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉवर म्हणजेच सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवनं देखील दमदार फलंदाजी केली. 


नवव्या ओव्हरमध्येच भारताच्या 100  धावा


भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी झिम्बॉब्वेच्या दौऱ्यात जो फॉर्म होता तो श्रीलंकेविरुद्ध कायम ठेवला. यशस्वी जयस्वालनं श्रीलंकेंच्या गोलंदाजांची धुलाई केली. यशस्वी जयस्वालनं 21 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2  षटकारांसह 40 धावा केल्या. शुभमन गिलनं देखील यशस्वी जयस्वाल प्रमाणेच आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. शुभमन गिलनं 6 चौकार आणि एका षटकारासह 16 बॉलमध्ये 34 धावा केल्या. शुभमन गिलनं आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर गमावली. यानंतर लगेचच यशस्वी जयस्वाल देखील बाद झाला. 


भारताच्या डावाला यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं 74 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. सूर्यकुमारनं सुरुवातीपासूनचं आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. यामुळं भारतानं नवव्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला. यशस्वी जयस्वाल मैदानावर चौकार षटकार मारत असताना कॅप्टन सूर्यकुमार यादव त्याचं टाळ्या वाजवून कौतुक करताना पाहायला मिळाला. 


भारताचा संघ : 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग,रिषभ पंत (यष्टीरक्षक),  हार्दिक पंड्या ,  अक्षर पटेल,  रवी बिश्नोई,  अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंकेचा संघ : 


चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,मथिशा पाथिराना, एम. तिक्षणा, दिलशान मदूशंका


टी 20 मालिकेचं वेळापत्रक


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)






संबंधित बातम्या :


पहिलाच टॉस सूर्यकुमार याच्या विरोधात, श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात कुणाला स्थान?

IND vs SL : रोहित शर्मा अन् विराट कोहली श्रीलंकेत कधी पोहोचणार? मोठी अपडेट समोर