कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची आहे. यामुळं रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहेत. टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ यापूर्वीच श्रीलंकेत दाखल झाला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी श्रीलंकेत दाखल होणार याबाबत अपडेट समोर आली आहे. 2 ऑगस्टपासून मालिका सुरु होत असल्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मा श्रीलंकेत तीन दिवस अगोदर असल्याची माहिती समोर आली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेसाठी 29 जुलैपर्यंत दाखल होतील, अशी माहिती समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका महत्त्वाची आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं या मालिकेला महत्त्व असल्यानं रोहित शर्मा, विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू देखील श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असल्यानं प्रशिक्षक गौतम गंभीरनं रोहित शर्मा, विराट कोहली यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेसाठी 29 जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची तयारी
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघाचे प्रयत्न सुरु आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार असल्याचं पाहायला मिळतं.
संबंधित बातम्या :