पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी 20 मॅचला सुरुवात झाली आहे.  श्रीलंकेनं पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकला. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळं  भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे. भारताचा टी 20 टीमचा नियमित कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) ही पहिलीच मॅच आहे. या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनं संजू सॅमसन, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान दिलं नाही.  


सूर्यकुमार यादवच्या ड्रीम टीममध्ये कुणाला संधी ? 


सूर्यकुमार यादवनं अपेक्षेप्रमाणं संघ निवड केली आहे. भारताच्या टीममध्ये अपेक्षेप्रमाणं रिषभ पंतला स्थान मिळालं तर संजू सॅमसनला संघाबाहेर थांबावं लागलं आहे. रिषभ पंतला संधी मिळाल्यानं संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. दुसरीकडे टीम ऑलराऊंडर शिवम दुबेला देखील संघात स्थान मिळालेलं नाही. वॉशिंग्टन सुंदर याला देखील सूर्यकुमार यादवनं संघाबाहेर ठेवलं. 


भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल करतील. तिसऱ्या स्थानी रिषभ पंत चौथ्या स्थानी सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल. रियान पराग,  हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग मधल्या फळीत फलंदाजी करतील. अक्षर पटेल आणि रवि बिश्नोई यांच्यावर फिरकी गोलंदाजीची धुरा असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. 


भारताचा संघ : 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग,रिषभ पंत (यष्टीरक्षक),  हार्दिक पंड्या ,  अक्षर पटेल,  रवी बिश्नोई,  अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंकेचा संघ : 


चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,मथिशा पाथिराना, एम. तिक्षणा, दिलशान मदूशंका


टी 20 मालिकेचं वेळापत्रक


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांची पहिली परीक्षा


सूर्यकुमार यादव याची भारतीय टी 20 संघाचा नियमित कॅप्टन म्हणून आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात टीम इंडिया पहिली मॅच खेळणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारत  श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणार का हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या :


IND vs SL : रोहित शर्मा अन् विराट कोहली श्रीलंकेत कधी पोहोचणार? मोठी अपडेट समोर 


Gautam Gambhir: राहुल द्रविडचा नव्या प्रशिक्षकाला खास मेसेज, गौतम गंभीर झाला भावूक, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर