पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिली टी 20 मॅच पल्लेकेले येथे पार पडली. भारतानं सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) , रिषभ पंत (Rishabh Pant), यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या दमदार खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 213  धावा केल्या होत्या. भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी 214  धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेच्या पथुम निसांका यानं 79 धावा आणि कुसल मेंडिसनं 45 धावा करत सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र, अक्षर पटेलनं निसांकाला बाद केलं आणि त्याच परेराला बाद करुन मॅच भारताच्या बाजूनं फिरवली. श्रीलंकेचा संघ 1 बाद 140 वर असताना पुढील 30 धावात सर्वबाद झाला. श्रीलंकेचा डाव 170  धावांवर आटोपला. अखेर भारतानं श्रीलंकेवर 43 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गौतम गंभीरच्या मार्गदर्शनातील हा भारताचा पहिला विजय ठरला. 


आक्रमक सुरुवातीनंतर डाव गडगडला 


भारतानं विजयासाठी श्रीलंकेपुढं विजयासाठी 214 ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेनं आक्रमक सुरुवात केली होती. पथुम निसांका आणि कुसल मेंडिसनं आक्रमक फलंदाजी केली होती. निसांका आणि मेंडिसनं 84  धावांची भागिदारी करत सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढवलं होतं. अर्शदीप सिंगनं कुसल मेंडिसला 45  धावांवर बाद केलं. यशस्वी जयस्वालनं कॅच घेत मेंडिसला माघारी पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर श्रीलंकेला निसांकाच्या रुपात 140  धावांवर असताना दुसरा धक्का बसला. निसांकानं 79  धावा केल्या.  निसांकाला अक्षर पटेलनं बाद केलं आणि इथंच मॅच भारताच्या बाजूनं फिरली. इथून पुढच्या 30 धावांमध्ये श्रीलंकेनं नऊ विकेट गमावल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर,रियान परागनं तीन, रवि बिश्नोई आणि मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली.


भारताचं श्रीलंकेपुढं विजयासाठी 214 धावांचं आव्हान 


भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7  विकेटवर 213 केल्या. भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात सलामीवीर यशस्वी जयस्वाल  आणि शुभमन गिल या दोघांनी केली. यशस्वी जयस्वालनं 40 आणि शुभमन गिलनं 34 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं भारतासाठी 74 धावांची सलामीची भागिदारी केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं 26 बॉलमध्ये 58 धावांची वादळी खेळी केली. तर, रिषभ पंतनं देखील 49 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंतशिवाय इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. भारतानं अखेर 20 ओव्हरमध्ये 7 बाद  213  धावा केल्या. 


श्रीलंकेकडून मथिशा पथिरानानं चार विकेट घेत भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. त्यानं चार ओव्हरमध्ये 40 धावा देत 4 विकेट घेतल्या.  श्रीलंकेनं क्षेत्ररक्षण करताना केलेल्या चुका देखील त्यांना महागात पडल्या. 


भारताचा संघ : 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग,रिषभ पंत (यष्टीरक्षक),  हार्दिक पंड्या ,  अक्षर पटेल,  रवी बिश्नोई,  अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंकेचा संघ : 


चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,मथिशा पाथिराना, एम. तिक्षणा, दिलशान मदूशंका


टी 20 मालिकेचं वेळापत्रक


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


 संबंधित बातम्या :


IND vs SL : यशस्वी, शुभमन अन् सूर्याची वादळी बॅटिंग, 9 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण, श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं


IND vs SL : पहिलाच टॉस सूर्यकुमार याच्या विरोधात, श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात कुणाला स्थान?