IND vs SL : पंत की सॅमसन, रिंकू की शिवम; श्रीलंकेविरुद्धच्या T20I मध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11?
T20 India Playing 11 : शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला उतरणार आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं स्थान पक्कं आहे.
![IND vs SL : पंत की सॅमसन, रिंकू की शिवम; श्रीलंकेविरुद्धच्या T20I मध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11? ind vs sl t20i india playing 11 probable Team India Rishabh Pant Sanju Samson shivam dube rinku singh marathi news IND vs SL : पंत की सॅमसन, रिंकू की शिवम; श्रीलंकेविरुद्धच्या T20I मध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/20/e42773c9c139d8cbf6b065c5db1390b81721484674915322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका (India VS Sri Lanka) आगामी टी20 सीरीजची सध्या तयारी सुरु आहे. ही सीरिज 27 जुलैपासून सुरु होणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि टी20 चा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यावर नव्याने जबाबदारी आल्यानंतर टीम इंडिया ही पहिली टी 20 सीरिज खेळणार आहे. श्रीलंकेच्या विरोधात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या T20I मध्ये कुणाला संधी मिळणार?
श्रीलंका दौऱ्यासाठी प्लेईंग 11 ठरवण्याचं आव्हान टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादववर असणार आहे. सलामीची जोडी फिक्स असली, तरी मध्यल्या फळीतील फलंदाज ठरवणं डोकेदुखी ठरणार आहे. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला उतरणार आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं स्थान पक्कं आहे.
पंत की सॅमसन, रिंकू की शिवम?
श्रीलंकेविरोधातील टी20 सीरिजमध्ये शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांची जोडी सलामीला उतरणार हे निश्चित आहे. याशिवाय मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याची जागा निश्चित आहे. ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि रिंकू सिंह या चार पैकी दोन खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार आहे. रिषभ पंत टी 20 विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. जर सूर्या तिसऱ्या क्रमांकावर खेळला नाही तर, संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. मात्र, तशी शक्यता कमी असल्याने पंतला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
रिंकू सिंहला संधी मिळण्याची शक्यता
हार्दिक पांड्या संघात परतल्यानंतर रिंकू सिंगला संधी मिळू शकते. शिवम दुबे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये प्लेइंग 11 मध्ये होता, कारण रिंकू सिंह राखीव होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंह की शिवम दुबे यापैकू कुणाची निवड करायची हा निर्णय डोकेदुखीचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहला संधी दिली जाऊ शकते.
तीन फिरकीपटूंचा समावेश
याशिवाय श्रीलंकेतील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य आहे, त्यामुळे यावेळी तीन फिरकीपटूंना संधी मिळू शकते. अक्षर पटेलशिवाय वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोईला संघात स्थान मिळू शकतं. तसेच अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज हे दोन वेगवान गोलंदाज असू शकतात. याशिवाय खलील अहमद हाही पर्याय असेल. भारतीय संघाकडे गोलंदाजीचे सहा पर्याय असतील.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताची संभाव्य प्लेईंग 11
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कोहली आणि रोहितची जागा कोण घेणार? माजी क्रिकेटपटकडून 4 जणांची नावे समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)