IND vs SL, 2nd T20I : पथुम निसांका याच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 183 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाला दुसरा सामना जिंकण्यासाठी 184 धावांचे आव्हान मिळाले आहे. दनुष्का गुणथिलका आणि पथुम निसांका यांनी श्रीलंका संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या काही षटकांमध्ये लंकेच्या सलामीवीरांना साधव फलंदाजी केली. त्यानंतर दोघांनाही तुफान फटकेबाजी केली. निसांका याने 53 चेंडूत 75 धावांची खेळी केली. तर गुणथिलका याने 38 धावांची खेळी केली आहे. कर्णधार दासुन शनाका याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. दासुन शनाका याने 19 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 47 धावांचा पाऊस पाडला. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत आली नाही. अखेरच्या पाच षटकांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी 80 धावा चोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान श्रीलंका संघाच्या कर्णधाराचे होतं.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रविंद्र जाडेजा आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हर्षल पटेल सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे. हर्षल पटेलच्या चार षटकात श्रीलंकेच्या फंलदाजांनी तब्बल 52 धावा वसूल केल्या. त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल नव्हता. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला होता. श्रीलंका संघात दोन बदल करण्यात आले होते.
भारतीय संघात बदल नाही –
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल
श्रीलंका संघात दोन बदल -
पथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलंका, दनुष्का गुणथिलका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, बिनुरा फर्नांडो, लाहिरु कुमारा
महत्वाच्या बातम्या :
MS Dhoni: 'स्वप्न सत्यात उतरलं' महेंद्रसिंह धोनीला भेटल्यानंतर पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया
IPL 2022: महाराष्ट्रात रंगणार आयपीएलचे सर्व सामने, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळण्याची शक्यता; क्रिडामंत्री म्हणाले...
India-Sri Lanka Pink Ball Test: भारत- श्रीलंका यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना परवानगी
IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live