IND Vs SL: तीन सामन्याची टी-20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. भारत- श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना पिंक बॉलनं खेळला जाणार आहे. बंगळुरू येथे खेळला जाणाऱ्या या डे-नाईट सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलीय. बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50% प्रेक्षक दुसऱ्या कसोटीत उपस्थित राहू शकतात.
भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12- 16 मार्च दरम्यान खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री येत्या 1 मार्चपासून सुरु होणार आहे. याशिवाय, प्रेक्षकांना तिकीट काऊंटरवरूनही तिकीट खरेदी करता येणार आहे. तिकीट काऊंटर 6-16 मार्च या कालावधीत सुरू असेल. तिकिटाची किंमत 100 ते 2500 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलीय. या कसोटीच्या तिकीट विक्रीबाबत कर्नाटक क्रिकेट असोसिएशननं प्रसिद्धीपत्रक जारी केलंय.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशननं प्रसिद्धीपत्रक-
भारताचा कसोट संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, सिराज, उमेश यादव, सौरव कुमार.
श्रीलंकेचा कसोटी संघ:
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, लाहिरू थिरिमाने, धनंजय डी सिल्वा, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चरित अस्लंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, रमेश मेन्डिस, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंता चमीरा, विश्व फर्नांडो, जेफरी वांडरसे, परवीन जयविक्रमा, लसिथ एम्बुलडेनिया.
हे देखील वाचा-
- IND vs SL : दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- IND vs SL : दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वादाचा फटका फुटबॉलला, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत महत्त्वाचा बदल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha