IND vs SL, 2nd T20 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे. श्रीलंका संघात दोन बदल करण्यात आले आहेत. धर्मशाला येथे शनिवारी सकाळी पाऊस पडला होता, त्यामुळे नाणेफेकीचा कौल सर्वात महत्वाचा होता. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत विजयाच्या दिशेने पाऊल उचलले आहे. 


भारतीय संघ - रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस्स अय्यर, संजू समसॅन, दीपक गुड्डा, वेंकटेश अय्यर, रविंद्र जाडेजा, हर्षल पेटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुवेंद्र चहल






वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे. धर्मशाला मैदानावर भारताचा दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरले.


लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 62 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. 


कोणाचं पारड जड? 
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे.


रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी -
मायदेशात आतापर्यंत सर्वाधिक टी-20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्याबाबतीत रोहित शर्मा हा मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या बरोबरीने उभा आहे. रोहित शर्मानं आतापर्यंत 16 टी-20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलंय. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, केवळ एका सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. इयॉन मॉर्गन आणि केन विल्यमसनंही संघाचं नेतृत्व करत त्यांच्या मायदेशात आतापर्यंत 15 टी-20 सामने जिंकले आहेत. दरम्यान, श्रीलंकाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात आज भारतानं विजय मिळवला तर रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ 16 वा टी-20 सामना जिंकून इतिहासाची नोंद करेल.