Ind vs SL 2nd T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने संघात एक बदल केला असून शुभमन गिलच्या (Shubhman Gill) जागी संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. शुभमन गिलला सराव करताना दुखापत झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली.  तर श्रीलंकाचा संघ देखील एक बदलासह मैदानात उतरला आहे.






टीम इंडियाने मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. श्रीलंकेच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही भारतासाठी विजय सोपा असणार नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या टी-20 सामन्यात दमदार सुरुवात केली होती. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले होते. हार्दिक पांड्या आणि रियान परागसारख्या फलंदाजांनी निराशा केली असली तरी टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. त्यानंतर गोलंदाजी कमाल दाखवत भारताने 43 धावांनी विजय मिळवला होता.


भारताची प्लेइंग इलेव्हन-


भारत : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रायन पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.


India (Playing XI): Yashasvi Jaiswal, Sanju Samson, Suryakumar Yadav(c), Rishabh Pant(w), Hardik Pandya, Riyan Parag, Rinku Singh, Axar Patel, Arshdeep Singh, Ravi Bishnoi, Mohammed Siraj


श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-


श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असालंका, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, रमेश मेंडिस.


Sri Lanka (Playing XI): Pathum Nissanka, Kusal Mendis(w), Kusal Perera, Kamindu Mendis, Charith Asalanka(c), Dasun Shanaka, Wanindu Hasaranga, Ramesh Mendis, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Asitha Fernando


भारत-श्रीलंका हेड टू हेड-


एकुण टी-20 सामने- 30
भारताचा विजय- 20
श्रीलंका- 9
अनिर्णित- 1


संबंधित बातमी:


IND vs SL : भारत अन् श्रीलंका मॅचमध्ये अजब प्रकार, एकाच गोलंदाजाची उजव्या अन् डाव्या हातानं बॉलिंग, पाहा काय घडलं?