IND vs SL : भारत अन् श्रीलंका मॅचमध्ये अजब प्रकार, एकाच गोलंदाजाची उजव्या अन् डाव्या हातानं बॉलिंग, पाहा काय घडलं?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं पहिल्या टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेला 43 धावांनी पराभूत केलं. भारतानं 7 विकेटवर 213 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 170 धावांवर बाद झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षर पटेलनं निसांका याला 79 आणि कुसल परेराला 20 धावांवर बाद करत मॅच भारताच्या बाजूनं फिरवली.
मथिशा पथिरानानं भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावला. त्यानं सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रियान पराग आणि रिषभ पंतला बाद केलं.
रियान परागनं श्रीलंकेच्या तीन विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. रियाननं सूर्यकुमार यादवनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेविरोधात 28 जुलै म्हणजे आज भिडणार आहे.
पहिल्या टी 20 मॅचमध्ये एक वेगळेपण पाहायला मिळालं ते म्हणजे कमिंडू मेंडिस यानं सूर्यकुमार यादवला डाव्या हातानं गोलंदाजी केली तर रिषभ पंतला उजव्या हातानं गोलंदाजी केली. विशेष म्हणजे आयसीसीच्या नियमानुसार अशी गोलंदाजी करणं योग्य आहे.