Rohit Sharma Denies Appeal After Shami calls for Mankading Against Dasun Shanaka: गुवाहाटीमध्ये (Guwahati) खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत टीम इंडियानं (Team India) श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेचा (Shri Lanka) कर्णधार दासुन शनाकानं (Dasun Shanaka) नाबाद 108 धावा केल्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यात श्रीलंकेचा संघ हरला असला तरी दासून शनाकाच्या शतकी खेळीचं सर्वजण कौतुक करत आहेत. मात्र, टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय त्याचं शतक अधुरंच राहिलं असतं. रोहितच्या एका निर्णयामुळे शनाकचं शतक पूर्ण झालं. रोहितनं ठरवलं असतं, तर शनाकाला शतक झळकावता आलं नसतं, पण रोहितनं असं केलं नाही. तुम्हीही विचार करत असाल की, नेमकं काय झालं? 


श्रीलंकेच्या डावातील 50 व्या षटकात चौथ्या चेंडूवर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं दासून शनाकाला मांकडिग आऊटवर (Mankading) म्हणजेच, नॉन स्ट्राईक एंडवर रनआऊट केलं होतं. परंतु, भारतीय कर्णधारानं मोठं मन दाखवत अपील केलं आणि अपील मागे घेतलं. रोहितच्या याच निर्णयामुळे शनाकानं आपलं शतक पूर्ण करु शकला. पण शनाकाच्या शतकी खेळीनंही श्रीलंका विजयापासून दूरच राहिली. रोहितनं घेतलेल्या या निर्णयामुळं त्याच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


कालच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय... 


टीम इंडियानं सर्वात आधी फलंदाजी करत 50 षटकांत 7 गडी गमावून 373 धावा केल्या होत्या. टीम इंडियानं दिलेलं आव्हान स्विकारत मैदानात उतरलेला श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी गमावून 306 धावाच करू शकला. श्रीलंकेसाठी कर्णधार दासुन शनाकानं नाबाद 108 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्यानं 12 चौकार आणि तीन षटकार मारले. तर सलामीवीर पथुम निसांकाने 72 धावा केल्या. पण तरीहि श्रीलंकेचा संघ विजयापासून दूरच राहिला आणि श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव झाला. 


टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कालच्या सामन्यात शानदार खेळी केली. उमरान मलिकनं 8 षटकांत 57 धावांत 3 खेळाडू बाद केले. तर, मोहम्मद सिराजनं दोघांना माघारी धाडलं. याशिवाय मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मात्र, टीम इंडियानं 3 वनडे मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, विराट कोहलीनं भारताकडून 113 धावांची शानदार खेळी केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Virat Kohli Century : शतक नंबर 73! नववर्षाच्या सुरुवातीला शतक ठोकत कोहलीनं नवा रेकॉर्डही केला नावावर