Virat Kohli 73rd Century : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. त्याने 91 चेंडूत 113 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक पूर्ण केले आहे. याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले होते. ज्यामुळे त्याने सलग दोन सामन्यात शतक झळकावत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.






हे विक्रमही केले नावावर


एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12, 500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याने वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक त्याने झळकावले. त्याचवेळी घरच्या मैदानावर त्याचे हे 20 वे आंतरराष्ट्रीय शतक होते. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे. त्याच्यासाठी 2023 वर्षाची सुरुवात चांगली झाली असून वर्षातील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावल्याने आता वर्षभरात आणखी शतकं ठोकेल अशी आशा आहे. 


रोहित शर्माही दिसला दमदार लयीत


या सामन्यात विराट कोहलीशिवाय रोहित शर्माने भारताकडून शानदार खेळी केली. त्याने 67 चेंडूत 83 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रोहितने संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याच्यासोबत आलेला शुभमन गिलही 70 धावांची इनिंग खेळून माघारी परतला.


10 तारीख कोहलीसाठी ठरली लकी


आज 10 तारखेला कोहलीने त्याचे 45 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही त्याने कारकिर्दीतील 44 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. तो सामना 10 डिसेंबर 2022 रोजी खेळला गेला होता आणि आजचा सामनाही 10 जानेवारीलाही खेळवला जात आहे.


हे देखील वाचा-