IND vs SA: टीम इंडियाची वर्ल्ड रेकार्ड बनवण्याची संधी हुकली!
IND vs SA: रासी व्हॅन डर डसेन आणि डेव्हिड मिलर यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला.
![IND vs SA: टीम इंडियाची वर्ल्ड रेकार्ड बनवण्याची संधी हुकली! IND vs SA: Team India misses world record for most consecutive T20I wins IND vs SA: टीम इंडियाची वर्ल्ड रेकार्ड बनवण्याची संधी हुकली!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/10/2e669ac193807571c36d95dc58476ea6_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs SA: रासी व्हॅन डर डसेन आणि डेव्हिड मिलर यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. या पराभवासह भारताची वर्ल्ड रेकार्ड बनवण्याची संधी हुकली आहे. भारतानं सलग 12 टी-20 सामन्यात विजय मिळवून आफगाणिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. परंतु, आतापर्यंत कोणत्याही संघानं सलग 13 टी-20 सामने जिंकले नाहीत. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडं सलग 13 वा टी-20 सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळं सलग 13 टी-20 सामना जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न भंगलंय.
रासी व्हॅन डर डसेन आणि डेव्हिड मिलरची तुफानी फलंदाजी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
सलग 13 वा सामना जिंकण्याचं स्वप्न भंगलं
दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत होण्यापूर्वी भारतानं सलग 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. भारतानं 13 वा सामना जिंकला असता तर अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरला असता. पण दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानं हे होऊ शकलं नाही. आफ्रिकन संघानं दिल्ली टी-20 सामन्यात भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतसाठी हा सामना अतिशय खास होता. पंतसाठी हा कर्णधार म्हणून पदार्पण सामना होता.
पंतनं धोनीचा विक्रम मोडला
विशेष म्हणजे पंतनं एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. कर्णधारपदाच्या विक्रमाच्या बाबतीत त्यानं माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागं टाकलंय. टी-20 सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा तो दुसरा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.
हे देखील वाचा-
- ENG vs NZ: नॉटिंगहॅम कसोटीपूर्वी न्यूझीलंडला जबर धक्का, कर्णधार केन विल्यमसन कोरोना पॉझिटिव्ह
- IND vs SA, Top 10 Key Points : भारताचा सात गड्यांनी धुव्वा, द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी, वाचा सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
- Rishabh Pant : ऑस्ट्रेलिया दौरा पंतच्या करिअरचा टर्निंग पॉईंट, पाहा दोन वर्षात काय झालं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)