एक्स्प्लोर

IND vs SA, Top 10 Key Points : भारताचा सात गड्यांनी धुव्वा, द. आफ्रिकेची मालिकेत आघाडी, वाचा सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

IND vs SA :  डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला.

IND vs SA :  डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली., पाहूयात सामन्यातील महत्वाचे दहा मुद्दे

दक्षिण आफ्रिेकाचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

एडन मार्करमला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्यातून वगळण्यात आले.

ईशान किशन (76) याची वादळी खेळी, त्यानंतर हार्दिक-पंतचा फिनिशिंग टचच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या.   ईशान किशन 76 तर श्रेयस अय्यर 36 धावांवर बाद झाले. 

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी 40 चेंडूत 80 धावांची भागिदारी केली. यामध्ये अय्यरने 15 चेंडूत 28 तर ईशान किशनने 25 चेंडूत 50 धावा चोपल्या. 

ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षठकात धावांचा पाऊस पाडला. पंत 16 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान पंतने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच देत संघाची धावसंख्या 200 पार पोहचवली. हार्दिक पांड्याने 31 धावांची नाबाद खेळी केली. 

भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. 

भारताने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा अवघ्या 10 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर डिकॉक आणि प्रिटोरिअस यांनी डाव सावऱण्याचा प्रयत्न केला. पण प्रिटोरिअस 29 आणि डिकॉक 22 धावांवर बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळला असे वाटत असतानाच डुसेन आणि डेविड मिलर यांनी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. दोघांनी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची भागिदारी केली. 

डेविड मिलरने नाबाद 64 तर डुसेन याने नाबाद 75 धावांची खेळी केली. दोघांनी तब्बल 10 षटकार लगावले. मिलर आणि डुसेनच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती.

भारताकडून एकाही गोलंदाजाने अचूक टप्प्यावर मारा केला नाही. प्रत्येक गोलंदाजाला 9 पेक्षा जास्त सरासरीने चोप बसला. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs SRH Live Score : प्लेऑफचं पहिलं तिकीट कोणाचं? गुजरात-हैदराबादमध्ये आज होणार महासंग्राम
GT vs SRH Live Score Update IPL 2026 : प्लेऑफचं पहिलं तिकीट कोणाचं? गुजरात-हैदराबादमध्ये आज होणार महासंग्राम
IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
Punjab Kings Playoff Scenario : आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?
आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?
Tim David News : मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Embed widget