Rishabh Pant : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आता कर्णधार ऋषभ पंत झाला आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेपूर्वी कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्यामुळे पंतला ही संधी मिळाली आहे. पंत कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून निवडला गेला आहे. दरम्यान पंत कर्णधार झाल्यानंतर सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपलं मनोगत व्यक्त करत दिलेल्या संधीसाठी बीसीसीआयचे (BCCI) आभार मानले.


बीसीसीआयसह ज्यांनी ज्यांनी आजवर सपोर्ट केला त्या साऱ्यांचे आभार पंतने मानले. तसंच ''ही जबाबदारी फार चांगल्या परिस्थितीत आलेली नाही, पण संधी मिळाल्यामुळे फार भारी वाटतंय'' असंही पंत म्हणाला. तसंच या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. संघाला आणि स्वत:ला एका चांगल्या पोजिशनवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असंही पंत म्हणाला. 



राहुल-कुलदीप दुखापतग्रस्त 


दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशी होणाऱ्या पाच टी 20 सामन्याच्या मालिकेला गुरुवारी 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाद झालेत. कुलदीप यादवला नेटमध्ये सराव करताना दुखापत झाली आहे.  पण राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयने सांगितलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू एनसीएमध्ये दाखल होतील. तिथे ते आपल्या फिटनेसवर काम करतील. तंदुरुस्त झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंचा पुढील मालिकेसाठी विचार करण्यात येईल. 


कसा आहे भारतीय संघ?


ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.


दुखापतग्रस्त - केएल राहुल, कुलदीप यादव


हे देखील वाचा-