IND vs SA : तीन वेगवान गोलंदाज, दोन ऑलराऊंडरला संधी, रिषभ पंतला बाहेर ठेवलं, भारताच्या माजी खेळाडूनं पहिल्या वनडेसाठी संघ निवडला
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली वनडे रांचीच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. या मालिकेत केएल राहुल भारताचं नेतृत्त्व करेल.

India vs South Africa रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विजय मिळवून भारतीय संघाकडे कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचं नेतृत्त्व करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर मायदेशात भारताकडून खेळताना दिसतील. उद्याच्या पहिल्या मॅचमध्ये कोणाला संधी द्यायची, कोणाला बाहेर ठेवायचं असा प्रश्न केएल राहुलसमोर आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथनं 15 खेळाडूंपैकी 11 जणांची निवड केली आहे.
एस. बद्रीनाथचं सूत्र काय?
एस. बद्रीनाथनं भारतीय संघ निवडताना तीन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. याशिवाय त्यानं दोन ऑलराऊंर खेळाडूंना संधी दिली आहे. मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवची निवड त्यानं केली. हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांना वेगवान गोलंदाज म्हणून बद्रीनाथनं स्थान दिलं. तर, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना ऑलराऊंडर संघात त्यानं स्थान दिलं आहे. विशेष बाब म्हणजे भारताचा विकेटकीपर रिषभ पंतला त्यानं बाहेर ठेवलं आहे. शुभमन गिलच्या जागी यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरच्या जागी ऋतुराज गायकवाड या दोघांना त्यानं स्थान दिलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील रिषभ पंतला संघात स्थान मिळालं नव्हतं. केएल राहुलनं हा विकेटकीपिंग देखील करत असल्यानं रिषभ पंतला वनडे संघातून बाहेर बसावं लागतं.
एस. बद्रीनाथनं निवडलेला संघ : रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड,रवींद्र जडेजा, केएल राहुल (कॅप्टन),वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग,
भारताचा संघ :
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन), रिषभ पंत, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड़, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
दक्षिण आफ्रिकेचा संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रुबिन हर्मन, केशव महाराज, मार्को जॅनसेन, एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, रायन सुबरेन, प्रिलेटन.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक
पहिली वनडे मॅच- 30 नोव्हेंबर- रांची
दुसरी वनडे मॅच - 3 डिसेंबर- रायपूर
तिसरी वनडे मॅच- 6 डिसेंबर- विशाखापट्टणम
My Playing XI for the 1st #INDvSA ODI 👇
— S.Badrinath (@s_badrinath) November 29, 2025
Rohit
Jaiswal
Virat
Ruturaj
Jadeja
KL (C and WK)
Washi
Kuldeep
Harshit Rana
Prasid Krishna
Arshdeep Singh #CricItWithBadri




















