IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांनी (Indian Women Cricket team) आतापर्यंत तीन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. समोर दक्षिण आफ्रिकेचं तगडं आव्हान आहे.


भारत सध्या गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघानी तीन तीन सामने जिंकले आहेत. पण नेटरनरेट भारताचा काहीसा कमी असल्याने भारत पाचव्या तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. उद्या इंग्लंडचाही सामना असून त्यांनी तो पराभूत झाल्यास आणि भारताने विजय मिळवल्यास भारत सहज सेमीफायनलमध्ये पोहोचेल. तर दोन्ही संघ जिंकल्यास भारताने इंग्लंडपेक्षा मोठ्या फरकाने सामना जिंकायला हवा. जेणेकरुन भारत सेमीफायलमध्ये पोहोचेल. 


स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी वेस्ट इंडीजला (India vs West Indies) मात दिली. पण चौथ्या सामन्यात इंग्लंडने आणि पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर निसटता विजय मिळवला. त्यानंतर बांग्लादेशवर भारताने तगडा विजय मिळवला असून आता भारताला उद्याचा विजयही महत्त्वाचा आहे.  


कुठे खेळवला जाणार सामना?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील हा सामना न्यूझीलंडच्या ख्रिस्टचर्च येथील हॅग्ले ओव्हल मैदानात खेळवला जाणार आहे.


कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील हा सामना उद्या अर्थात 27 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.


कसा पाहाल सामना?


हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.


भारतीय संघ:


मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha