PAK VS AUS: पाकिस्तानविरुद्ध लाहोरमध्ये खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं 115 धावांनी विजय मिळवलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाकिस्तानसमोर 351 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. परंतु, पाकिस्तानचा संघ 235 धावांवर आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेऊन कसोटी मालिका जिंकला. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित ठरला. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार प्रदर्शन करीत ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला. तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानात  जाऊन ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमवल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. 




ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियानं केवळ आठ धावांवर दोन विकेट्स गमावले.  यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी शतकी भागीदारी करत डावाची धुरा सांभाळली. ख्वाजानं 91 आणि स्मिथनं 59 धावा केल्या. याशिवाय कॅमेरून ग्रीननं 79 आणि अॅलेक्स कॅरीनं 67 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 391 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाहनं यांना प्रत्येकी चार- चार विकेट्स मिळाल्या. तर, नौमान आणि साजिद खान प्रत्येकी एक-एक विकेट्स प्राप्त केली. 


पाकिस्तानचा पहिला डाव
या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या संघानं 20 धावांवर त्यांची पहिली विकेट्स गमावली.त्यानंतर अबदुल्लाह शफीक आणि अजहर अलीनं 150 धावांची भागीदारी करत संघाला डाव संभाळला. शकीफनं 81 तर, अलीनं 78 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार बाबर आझमनं 67 धावांची दमदार खेळी केली. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यामुळं पाकिस्तानच्या संघाला 268 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं पाच विकेट्स घेतल्या. तर, नाथ लायनला एक विकेट्स मिळाली. 




ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करत तीन गडी गमावून 227 धावांवर डाव घोषित केला. ख्वाजानं नाबाद 104 धावा केल्या. त्याचवेळी वॉर्नरनं 51 आणि लॅबुशेननं 36 धावा करत पाकिस्तानसमोर 351 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि नौमान अली यांनी प्रत्येकी एक विकेट मिळाली. 


पाकिस्तानचा दुसर डाव
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 351 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 235 धावा करू शकला. ज्यामुळं त्यांनी 115 धावांनी सामना गमावला. इमाम-उल-हकनं 70 आणि कर्णधार बाबर आझमनं 55 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लायननं पाच आणि पॅट कमिन्सने विकेट्स घेतल्या.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha