IPL 2022, MI vs DC : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला आज सुरुवात झाली आहे. चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली असून मुंबईकरांसाठी मात्र आयपीएलची खरी सुरुवात उद्या अर्थात 27 मार्चला होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा पहिला सामना उद्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (MI vs DC) खेळवला जाणार आहे. 


आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर मुंबई इंडियन्सचच नाव समोर येतं. कारण सर्वाधिक म्हणजेच 5 वेळा त्यांनी ट्रॉफी उंचावली आहे. यंदाही इतर संघात मोठे बदल झाले असले तरी मुंबईचे महत्त्वाचे खेळाडू संघात कायम असल्याने मुंबईचं पारडं यंदाही जडच आहे. त्यामुळे यंदा स्पर्धेची सुरुवात मुंबईचा संघ कसा करेल हे पाहावं लागेल. 


कधी आहे सामना?


शनिवारी, 26 मार्च रोजी होणारा मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना रंगणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-