IND vs SA 5th T20 : अहमदाबादचा रणसंग्राम जिंकला! दक्षिण आफ्रिकेवर भारताचा 30 धावांनी दणदणीत विजय
IND vs SA 5th T20 Scorecard Update Marathi : भारतीय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेतील पाचव्या आणि शेवटचा टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.
LIVE

Background
India vs South Africa 5th T20I Live Cricket Score Update : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेतील पाचव्या आणि शेवटचा टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत सात गडी राखून विजय नोंदवला. लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर होणारा चौथा टी20 सामना मात्र धुक्यामुळे रद्द करण्यात आला.
भारत 2-1 ने पुढे असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आता जास्तीत जास्त मालिका बरोबरीत सोडवण्याचीच संधी आहे. भारताने हा सामना जिंकल्यास, तो सलग 14 वी टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे करेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या टी20 सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND vs SA 5th T20 : अहमदाबादचा रणसंग्राम जिंकला! दक्षिण आफ्रिकेवर भारताचा 30 धावांनी दणदणीत विजय
भारताने पाचवा टी-20 सामना 30 धावांनी जिंकला.
यासह टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला आणि सलग सातवी टी-20 मालिका जिंकली.
शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने 20 षटकांत पाच गडी बाद 231 धावा केल्या.
प्रत्युत्तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत आठ गडी बाद 201 धावाच करू शकला आणि सामना गमावला.
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माची वादळी खेळी; दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य
हार्दिक आणि तिलकच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले




















