Ind vs Sa 4th T20 Match Called Off : ना पाऊस, ना वादळ… तरी भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामना रद्द, नाणेफेक पण झाले नाही, नेमकं काय घडलं?
Ind vs Sa 4th T20 Marathi News : भारतीय क्रिकेट संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवण्याच्या निर्धाराने लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरणार आहे.
LIVE

Background
India vs South Africa 4th T20 Updtae Marathi : भारतीय क्रिकेट संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवण्याच्या निर्धाराने लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सध्या 2-1 अशी आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकताच भारताला ही मालिका आपल्या नावावर करता येणार आहे. मात्र, या निर्णायक लढतीआधी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिलच्या खराब फॉर्मने संघाची चिंता वाढवली आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये हे दोन्ही फलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. महत्त्वाच्या सामन्याआधी त्यांचा फॉर्म परत येणे टीम इंडियासाठी अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
Ind vs Sa 4th T20 Match Called Off : ना पाऊस, ना वादळ… तरी भारत-दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामना रद्द, नाणेफेक पण झाले नाही, नेमकं काय घडलं?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना अखेर रद्द करण्यात आला.
लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज हा सामना होणार होता.
सामन्याच्या वेळेपूर्वीच मैदानावर दाट धुके आणि स्मॉगची चादर पसरली होती.
दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने पंचांनी वेळोवेळी मैदानाची पाहणी केली.
खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता टॉसही होऊ शकला नाही.
बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला.
भारत या मालिकेत आघाडीवर असून हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी होती.
मात्र सामना रद्द झाल्याने मालिकेचा निकाल आता शेवटच्या सामन्यावर अवलंबून राहणार आहे.
Ind vs Sa 4th T20 Live Score : कट-ऑफ नियम काय आहे?
5 षटकांच्या सामन्यासाठी सामना किमान 9:46 वाजता सुरू होणे आवश्यक आहे.
पण, जर तोपर्यंत सामना सुरू झाला नाही तर सामना रद्द केला जाईल.




















