एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs SA 4th T20 : राजकोटच्या मैदानावर भारतीय संघाचं पारडं जड, मालिकेत बरोबरी करण्यासाठी उतरणार टीम इंडिया

South Africa tour of India 2022 : भारत आणि दक्षिण अफ्रिका (india vs south africa) यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज होणार आहे.

South Africa tour of India 2022 : भारत आणि दक्षिण अफ्रिका (india vs south africa) यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज होणार आहे. राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर  (saurashtra cricket association stadium) भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने उतरेल. पाच सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना करो या मरो असा आहे. तर हा सामना जिंकून मालिका विजयाच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल. 

राजकोटमध्ये भारतीय संघाची कामगिरी -
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर  टी 20 सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. होय... या मैदानावर भारतीय संघ आतापर्यंत तीन टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये टीम इंडियाने दोन सामन्यात बाजी मारली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.  

नाणेफेक महत्वाची - 
राजकोटच्या मैदानात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. कारण, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत विजय नोंदवलाय. अशात ऋषभ पंतला नाणेफेकीचा कौल जिंकावा लागेल. दक्षिण आफ्रिकाविरोधात झालेल्या पहिल्या तिन्हीही सामन्यात ऋषभ पंतला एकदाही नाणेफेक जिंकता आली नाही. 

पावसाची शक्यता -
फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाव्यतिरिक्त राजकोटचे हवामान भारतासमोर मोठं आव्हान उभं करू शकताच. राजकोटमध्ये नुकताच पाऊस झाला असून शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात पावसामुळं व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवामान वेबसाईटनुसार, राजकोटमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजकोट येथे  15 ते 25 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे.

भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 10 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.

भारताचा संभाव्य संघ-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ-
क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसीव्हेन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget