Shardul Thakur : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शार्दूलने पहिल्या डावात तब्बल 7 विकेट घेत इतिहास रचला आहे. आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर (The Wanderers Stadium, Johannesburg) सुरु असलेल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 202 धावाच केल्या ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली होती. पण शार्दूलने एकामागोमाग एक 7 फलंदाजांना तंबूत धाडत आफ्रिकेला 229 धावांत रोखलं. यावेळी शार्दूलने बरेच रेकॉर्ड नावावर केले.
- शार्दुलने एका डावात सात विकेट घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत इतकी उत्कृष्ट कामगिरी करणारा तो पहिला भारतीयच नाही तर आशियाई खेळाडू ठरला आहे.
- शार्दुलने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सात विकेट्स एका डावात पटकावले आहेत.
- चौथ्या स्थानावर गोलंदाजीला येऊन अशी कामगिरी करणारा शार्दुल पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी 1981 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 28 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
- शार्दुल ठाकुरने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत 100 वर्षांमध्ये अशी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा दुसरा परदेशी गोलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडच्या एंड्रयू कॅडिक यांनी 1999 मध्ये 46 धावा देत 7 विकेट्स घेतल्या आहेत.
हे ही वाचा -
- Ind vs SA, 2nd Test, 2nd Day Highlights: दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताकडे 58 धावांची आघाडी, सलामीवीर मयांक-राहुल मात्र तंबूत परत
- रहाणे-पुजाराप्रमाणे कोहलीही खराब फॉर्ममध्ये तरी त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत : आशिष नेहरा
- IND vs SA : भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रीकेनेही जाहीर केला एकदिवसीय संघ, टेम्बा बावुमाकडे कर्णधारपद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha