Ind vs Sa 2nd ODI : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये रेड्डीला संधी का नाही?, संघ निवडीत काहीतरी गडबड...; दुसऱ्या वनडे सामन्याआधी दिग्गज क्रिकेटपटू संतापला
R Ashwin and Nitish Kumar Reddy : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

R Ashwin Slams Selectors : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रविवारी रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पहिले फलंदाजी करत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 332 धावांवर संपला आणि भारताने 17 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतरही माजी भारतीय फिरकीपटू आर. अश्विन याने टीम निवडीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नीतीश कुमार रेड्डीला संधी न मिळाल्याने अश्विन नाराज
आर अश्विन याने विशेषतः युवा ऑलराउंडर नीतीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे पदार्पण केलेला आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी कसोटी संघात असलेला रेड्डी हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर असताना वनडे टीममध्ये खेळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. पांड्या उपलब्ध नसताना रेड्डीला संधी देणे आवश्यक होते, असेही त्याने स्पष्ट केले.
अश्विनांचा थेट सलाव
अश्विन याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर स्पष्टपणे सांगितले की “जर हार्दिक पांड्या टीममध्ये नाहीत आणि तरीही आपण नीतीश रेड्डीसाठी जागा दिऊ शकत नसू, तर स्क्वाड सिलेक्शनमध्ये कुठेतरी गडबड आहे.” तो पुढे म्हणाला की, “नीतीश असा खेळाडू आहे जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान देऊ शकतो. त्याच्याकडे हार्दिकसारख्या ऑलराउंडरची क्षमता आहे आणि तो वेळेनुसार आणखी परिपक्व होईल. मग त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये का जागा मिळत नाही? टीम सिलेक्शनचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे.”
22 वर्षांचा ऑलराउंडर, भविष्याचा सुपरस्टार...
नीतीश कुमार रेड्डीने आतापर्यंत भारतासाठी 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 10 कसोटी, 2 वनडे आणि 4 टी-20 सामन्यात त्याने 513 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या. त्याने कसोटी पदार्पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 दरम्यान ऑस्ट्रेलियात केले, तर वनडे पदार्पण पर्थ येथे झाले.
Ravi Ashwin said : “If we are not able to find a place for Nitish Kumar Reddy in a team that does not have Hardik Pandya, then there is something wrong in the squad selection. Why was he not picked?” pic.twitter.com/YMOm8DRPP0
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) December 2, 2025
भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
हे ही वाचा -
Devdutt Padikkal Century : टीम इंडियाने ज्याला बाहेर फेकलं, त्यानेच घातला धुमाकूळ, तुफानी शतक, BCCI दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत देणार संधी?





















