एक्स्प्लोर

IND vs SA 1st Test : फलंदाजीसह गोलंदाजीही पुरती ढासळली, सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर

IND vs SA Test Series : भारतीय संघाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत एकदाही विजय मिळवता आलेला नाही. टीम इंडिया हा नकोसा विक्रम तोडण्याच्या प्रयत्नात आहे.

India vs South Africa Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत (Test Series) टीम इंडिया (Team India) बॅकफूटवर आहे. बुधवारी कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला 11 धावांची आघाडी मिळाली आहे. टेस्ट सीरिजच्या (Test Cricket) दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीसह गोलंदाजीही ढासळली. दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरने दमदार खेळी केली. एल्गर शतकी खेळी करुन नाबाद आहे. भारतीय फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. टीम इंडियाची खेळी मात्र पुरती ढासळल्याचं दिसत आहे. केएल राहुलशिवाय कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आलेली नाही.

टीम इंडियाचा खराब फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केएल राहुल वगळता कोणत्याही खेळाडूला जास्त धावा काढता आलेल्या नाहीत. केएल राहुलने 14 चौकार आणि 4 षटकार ठोकत 101 रनांची शतकी खेळी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 17 धावांवर माघारी परतला तर रोहित शर्मा 5 धावांवर आऊट झाला. शुभमन गिल अवघ्या दोन धावा करून तंबूत परतला. विराट कोहली 38 आणि श्रेयस अय्यर 31 धावांवर बाद झाले. खराब फलंदाजीमुळे या कसोटी मालिकेत भारत बॅकफूटवर असल्याचं दिसत आहे.

डीन एल्गरला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश

फलंदाजांसह टीम इंडियाच्या गोलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावून 256 धावा केल्या होत्या. शतकानंतरही डीन एल्गरला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं. एल्गरने 211 चेंडूत 140 धावा केल्या, यामध्ये 23 चौकारांचा समावेश आहेत. एल्गर भारतीय गोलंदाजांवर वरचढ ठरल्याचं दिसत असून तो नाबाद आहे. त्याच्यासोबत डेव्हिड बेडिंगहॅमनेही शानदार अर्धशतकी खेळी केली, मात्र, नंतर तो बाद झाला.

सिराज आणि शार्दुलची गोलंदाजी महागात

भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. प्रसिध कृष्णाला एक विकेट घेता आली. कृष्णा आणि सिराजने विकेट घेतल्या पण त्यांनी जास्त धावा दिल्या. शार्दुल ठाकूरही महागात पडला. शार्दुलने 12 षटकात 57 धावा दिल्या, तर सिराजने 15 षटकात 63 धावा दिल्या. टीम इंडियाला आता तिसर्‍या दिवशी चांगली गोलंदाजी करून डीन एल्गरला बाद करण्याची गरज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget