IND vs SA, Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला अखेर सुरुवात होत असून पावसामुळे 1.30 वाजता सुरु होणारा सामना उशिराने सुरु होत आहे. भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. दरम्यान मालिकेतील पहिलाच सामना असल्याने नेमकी कोणा-कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भारताने आपली अंतिम 11 जाहीर केली आहे. यावेळी मोठी गोष्ट म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांनी आज एकदिवसीय संघात पदार्पण केलं आहे.
अंतिम 11 चा विचार करता कर्णधार शिखर आणि उपकर्णधार श्रेयससह गिल आणि ऋतुराज यांना वरच्या फळीत घेतलं आहे. ईशान आणि संजू असे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजही संघात आहेत. तर शार्दूलवर अष्टपैलू कामगिरी निभावण्याची जबाबदारी आहे. फिरकीपटू कुलदीपसह रवी बिश्नोई संघात आहे. तर मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली आहे.
कसे आहेत अंतिम 11?
भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान
प्रत्येकी संघ 40 षटकं खेळणार
आधी 1.30 वाजता सुरु होणारा सामना जवळपास 2 ते 2.30 तास उशिराने होत आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर नाणेफेक पार पडली. पण सामन्याची 1.30 वाजताची वेळ पुढे ढकलल्याने दोन्ही संघाला 45 ओव्हर्स खेळायला मिळणार होत्या, पण आणखी उशिर झाल्याने ही संख्या 40 ओव्हर्स इतकी करण्यात आली. तसंच पहिला पॉवरप्ले 8 ओव्हर्स, दुसरा पॉवपप्ले 24 ओव्हर्स आणि तिसरा 8 ओव्हर्स असा असणार आहे.
हे देखील वाचा-