T20 World Cup 2022 :  येत्या 16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे.  या स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. आजपासून भारतीय संघाचं मिशन वर्ल्ड कप सुरु झालं आहे. ऑस्ट्रेलियात यावर्षीची  T20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ पर्थला रवाना झाला आहे. त्या ठिकाणी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुपर-12 च्या गट-2 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. 


गट-2 मध्ये भारतासोबत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघाचा समावेश


आगामी टी-20 विश्वचषकाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुपर-12 च्या गट-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. पात्रता फेरीनंतर दोन संघ गटात सामील होतील. दरम्यान, अलीकडेच, भारतीय संघाने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला आहे. तिसरा सामना इंदूरमध्ये झाला, ज्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकाबाबत अपडेट दिले. तो म्हणाला होता की, संघातील काही लोक ऑस्ट्रेलियाला गेलेले नाहीत. म्हणूनच आम्हाला तिथे लवकर जायचे आहे. पर्थच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर तुम्ही काही सामने खेळलात तर तुम्हाला परिस्थिती कळेल. संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंपैकी केवळ 7 ते 8 खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियाला गेले असल्याचे रोहित शर्माने सांगितले होते.


भारतीय संघ विश्वचषकापूर्वी 4 सराव सामने खेळणार 


टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न इथं होणार आहे. टीम इंडिया आधी पर्थला पोहोचेल. 13 तारखेपर्यंत इथे सराव शिबिर होणार आहे. यादरम्यान दोन सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. हे दोन्ही सराव सामने बीसीसीआयनेच आयोजित केले आहेत, जे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवले जातील. हे दोन्ही सामने 10 आणि 12 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. यानंतर भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये दोन आयसीसी सराव सामनेही खेळायचे आहेत. हे दोन्ही आयसीसी सराव सामने 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळवले जाणार आहेत. 


सराव सामने 


वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन: 10 ऑक्टोबर
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन :12 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया : 17 ऑक्टोबर
न्यूझीलंड: 19 ऑक्टोबर 


अधिकृत वेळापत्रक


भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 PM (मेलबर्न) 
भारत विरुद्ध ग्रुप ए उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अ‍ॅडलेड)
भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न) 


T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ : 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.


महत्त्वाच्या बातम्या:


Most Catches in T20 World Cup: टी-20 विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंची यादी, टॉप 5 मध्ये एकमेव भारतीय