IND vs SA, Toss Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे 1.30 वाजता सुरु होणारा सामना जवळपास 2 ते 2.30 तास उशिराने होत आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर नाणेफेक पार पडली आहे. यावेळी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan)  नेतृत्त्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरत आहे.






सामन्याची 1.30 वाजताची वेळ पुढे ढकलल्याने दोन्ही संघाला 45 ओव्हर्स खेळायला मिळणार होत्या, पण आता ही संख्या 40 ओव्हर्स इतकी करण्यात आली आहे. तसंच पहिला पॉवरप्ले 8 ओव्हर्स, दुसरा पॉवपप्ले  24 ओव्हर्स आणि तिसरा 8 ओव्हर्स असा असणार आहे.









कशी आहे अंतिम 11?


आज कर्णधार शिखर आणि उपकर्णधार श्रेयससह गिल आणि ऋतुराज यांना वरच्या फळीत घेतलं आहे. ईशान आणि संजू असे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजही संघात आहेत. तर शार्दूलवर अष्टपैलू कामगिरी निभावण्याची जबाबदारी आहे. फिरकीपटू कुलदीपसह रवी बिश्नोई संघात आहे. तर मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दिली गेली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा हाच असून डी कॉककडे महत्त्वाची जबाबदारी आहे. जनेमन मालन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलरवर फलंदाजीची जबाबदारी असून वेन पारनेल, केशव महाराज अष्टपैलू कामगिरी करतील यासाठी त्यांना संघात घेतलं आहे. तर कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी यांना संघात घेतलं आहे.


असा आहे भारतीय संघ


शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, आवेश खान


असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ


जनेमन मालन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी


हे देखील वाचा-