Jasprit Bumrah : ऑस्ट्रलेयाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वीच भारताला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातूनबाहेर झाला आहे. तो विश्वचषकातून बाहेर गेल्यान भारताची गोलंदाजी कमजोर झाली असून याचा मोठा तोटा भारताला होईल असं म्हटलं जात आहे, पण असं असतानाही भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने मात्र बुमराह नसला तरी भारत विश्वचषक जिंकवू शकतो असं म्हटलं आहे.


काय म्हणाला जाडेजा?


बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर गेल्यामुळे सर्व क्रिकेटरसिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून दिग्गजही याबाबत चर्चा करत असून याबद्दलच बोलताना भारताचा माजी क्रिकेटर अजय जाडेजाने बुमराहशिवायही भारत जिंकू शकतो असं म्हणत पाकिस्तान्या वकार युनिसचं उदाहरण दिलं. वकारशिवाय पाकिस्तानने 1992 सालचा विश्वचषक जिंकला होता, हे उदाहरण दिलं आहे. तसंच बुमराहशिवायही भारत सामने जिंकू शकतो हे सांगताना जाडेजा म्हणाला, ''यंदा बराच काळ बुमराह दुखातीमुळे संघाबाहेर होता. यावेळीही भारताची कामगिरी चांगली होती, त्यामुळे विश्वचषकात तो नसतानाही भारत चांगली कामगिरी करु शकतो, असं जाडेजा म्हणाला.





पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह विश्वचषकाबाहेर




मागील काही महिने बुमराह दुखापतीमुळे तसंच विश्रांती घेण्यासाठी संघात आत-बाहेर असल्याचं दिसून येत आहे. आता आशिया कपपूर्वी महिन्यात बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत होत, ज्यानंतर आता तो संपूर्ण टी20





हे देखील वाचा -