IND vs SA, Toss Delayed : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. पण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला पावसाच्या व्यत्ययामुळे सुरु होण्यास उशिर होत आहे. दरम्यान पावसाने आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळे काही वेळातच नाणेफेक होणार आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आता 3.30 ला नाणेफेक होऊन 3.45 ला सामना सुरु होईल.
सामन्याची 1.30 वाजताची वेळ पुढे ढकलल्याने दोन्ही संघाला 45 ओव्हर्स खेळायला मिळणार होत्या, पण आता ही संख्या 40 ओव्हर्स इतकी करण्यात आली आहे. तसंच पहिला पॉवरप्ले 8 ओव्हर्स, दुसरा पॉवपप्ले 24 ओव्हर्स आणि तिसरा 8 ओव्हर्स असा असणार आहे.
कसा निवडला आहे संघ?
एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात आयपीएल 2022 गाजवणारे रजत पाटीदार, शाहबाज अहमद असे युवा खेळाडू आहेत. तर कुलदीप यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर या सध्या संघाबाहेर असणाऱ्या स्टार खेळाडूंनाही संघात घेतलं आहे. शिखरनं याआधी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघाचं उत्तम नेतृत्व केलं होतं, त्यामुळे तो संघाचा कर्णधार असून श्रेयसवर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नेमका संघ कसा आहे पाहू...
कसा आहे भारतीय संघ?
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-