IND vs PAK: ना ड्रोन, ना बॉम्ब हल्ला, भारत-पाक सामन्याला कडेकोट सुरक्षा, संपूर्ण अहमदाबादला छावणीचं स्वरुप
IND vs PAK World Cup Match Security : विश्वचषकातील सर्वात मोठा हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये शनिवारी होत आहे
IND vs PAK World Cup Match Security : विश्वचषकातील सर्वात मोठा हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये शनिवारी होत आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (narendra modi stadium) होणार आहे. या सामन्याआधी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सामन्याचा माहोल पाहता स्टेडिअम आणि अहमदाबादमध्ये छावणीचे स्वरुप आले आहे. पोलिसांसह NSG आणि RAF चे जवान तैणात करण्यात आले आहेत.
शनिवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धींचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. विश्वचषकातील या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खबरदारी म्हणून अहमदाबादमध्ये मोठी सुरक्षाव्यवस्था तैणात करण्यात येणार आहे. स्टेडिअमसह अहमदाबादमधील संवेदनशील परिसरात जवान तैणात होणार आहे. 10 ते 15 हजार इतका इतिरिक्त फौजफाटा सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणार असल्याचे वृत्त आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी गुजरात पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि अँटी ड्रोन पथकासह नॅशनल सिक्योरिटी गार्ड (NSG) आणि रॅपिड एक्शन फोर्स (RAF) ही तैणात होणार आहे. या सर्व सुरक्षा एजन्सीचे मिळून 11 हजार पेक्षा जास्त स्टाफ अहमदाबादमध्ये ड्यूटीवर असतील. सामन्याच्या तीन दिवस आधीपासूनच सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. अहमदाबाद पोलीस कमिश्नर ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी सांगितले की, NSG ची तीन पथके आणि अँटी ड्रोनतचे एक पथक आपले काम करेल. बम डिस्पोजल स्क्वॉडही यादरम्यान कार्यक्रत असेल. त्याशिवाय NDRF आणि SDRF चे पथकही ड्यूटीवर असेल.
सात वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2019 च्या विश्वचषकानंतर भारतात होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकार, बीसीसीआय आणि गुजरात राज्य सरकार सुरक्षेची पूर्ण काळजी घेत आहे. सुरक्षेत कोणताही कसर सोडली जाणार आहे. या सामन्यावेळी सुरक्षा व्यवस्थेवर विविध एजन्सीची नजरही असेल. नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृह राज्य मंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत सुरक्षेची माहिती घेतली.
स्टेडिअम उडवण्याची धमकी ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधानांना इजा करण्याची आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी दिली होती. ई मेल पाठवणाऱ्याने 500 कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगातून सुटका करण्याची मागणीही केली होती.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ओपनिंग सेरेमनी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लाइट शो, डान्स परफॉर्मेंस आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांचा लाइव्ह परफॉर्मेंस होणार आहे. त्याशिवाय भारत पाकिस्तान सामन्यावेळी खास सेलिब्रेटिंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे.