India vs Pakistan Catch Controversy: रडीचा डाव की नव्या नियमाने घात, पाक खेळाडूचा कॅच पकडूनही नॉट आऊट, भारताच्या सामन्यात काय घडलं?
India vs Pakistan Catch Controversy: भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यात टीम इंडियाच्या नेहाल वधेरा आणि नमन धीर यांनी घेतलेल्या एका झेलवरुन बराच वाद झाला.

India vs Pakistan Catch Controversy: आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या स्पर्धेत (IND vs PAK Asia Cup Rising Stars) काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात (Ind vs Pak) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यात टीम इंडियाच्या नेहाल वधेरा आणि नमन धीर (India vs Pakistan Catch Controversy) यांनी घेतलेल्या एका झेलवरुन बराच वाद झाला.
नेमकं काय घडलं? (India vs Pakistan Catch Controversy)
भारतीय संघाचा फिरकीपटू सुयश शर्मा 10 व्या षटकात गोलंदाजी करत होता. यावेळी माज सदाकतने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या नेहाल वधेराने हवेत चेंडू पकडण्याचा उत्तम प्रयत्न केला. तोल गमावून त्याने सीमारेषेच्या आत उभ्या असलेल्या नमन धीरकडे चेंडू फेकला आणि त्याने झेल पूर्ण केला. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरु केले. झेल पूर्णपणे पकडला आहे, असं व्हिडीओवरुन दिसून आले. मात्र झेल पुन्हा पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी माज सदाकतला नॉट-आऊट दिले. पंचांच्या या निर्णयानंतर सर्व खेळाडू चक्रावले. कर्णधार जितेश शर्मासह सर्व खेळाडू पंचांच्या अंगावर धावत जात वाद घालू लागले. परंतु कॅच पकडूनही नॉट आऊट माज सदाकतला नॉट-आऊट का देण्यात आले?, आयसीसीचा नवीन नियम काय सांगतो, जाणून घ्या...
नवीन आयसीसी नियमामुळे वाद- (ICC Catching New Rule)
ऑक्टोबर 2025 पासून लागू होणाऱ्या आयसीसीच्या नवीन क्षेत्ररक्षण नियमांनुसार:
1- क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर हवेत असताना चेंडूला एकदा स्पर्श करू शकतो.
2- क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्पर्श करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी मैदानात नियंत्रण मिळवले तरच झेल वैध मानला जातो.
आयसीसीच्या नवीन नियमांनूसार माज सदाकत नॉट-आऊट-
या संपूर्ण प्रकरणात, असे मानले गेले की नेहाल वधेरा चेंडू आत टाकल्यानंतर मैदानात परतला नाही आणि तो स्वतः सीमारेषेबाहेर गेला होता. त्यामुळे, झेल "निष्पक्ष झेल" म्हणून पात्र ठरला नाही आणि सदाकतला नॉट आऊट घोषित करण्यात आले.
It was all happening in Qatar 👀 And things got pretty heated in the middle...
— Sony LIV (@SonyLIV) November 16, 2025
Watch India A take on Pakistan A in #AsiaCupRisingStars2025 - LIVE NOW on #SonyLIV and #SonySportsNetwork TV channels 📺 pic.twitter.com/OZ56KQYxf0
सामना कसा राहिला? (IND vs PAK Asia Cup Rising Stars)
भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या दोघांनी केली. मात्र, प्रियांश आर्य 10 धावा करुन बाद झाला. यानंतर नमन धीर आणि वैभव सूर्यंवशी या दोघांनी भारताचा डाव सावरला. भारताची दुसरी विकेट 79 धावांवर गेली. नमन धीर 35 धावा करुन बाद झाला. त्यानंतर नियमित अंतरानं भारताच्या विकेट पडत राहिल्या. वैभव सूर्यवंशी 45 धावांवर बाद झाला. इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कॅप्टन जितेश शर्मा 5 धावा काढून बाद झाला. रमण दीप आणि हर्ष दुबे यांनी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भारताचा संघ 136 धावांपर्यंत पोहोचू शकला. 137 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननं भारतावर 8 विकेटनं विजय मिळवला. पाकिस्तानचे केवळ दोन फलंदाज बाद करण्यात भारताला यश आलं. पाकिस्तानच्या माझ सदाकतच्या नाबाद 79 धावांच्या जोरावर पाकिस्तानने हा सामना 8 विकेट्सने जिंकला.





















