एक्स्प्लोर

आधी बॅट तोडली मग विकेट काढली, हॅरिस रौफच्या वेगासमोर श्रेयस अय्यरची हाराकिरी 

Haris Rauf's Bowling : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडियम सुरु आहे.

Shreyas Iyer's bat broken on Haris Rauf's Bowling : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला श्रीलंका येथील पल्लेकेले स्टेडियम सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने दमदार सुरुवात केली. भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांना त्यांनी झटपट माघारी धाडले. पावसामुळे दोन वेळा सामना थांबवावा लागला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ श्रेयस अय्यरही लगेच तंबूत परतला. 

टीम इंडियात मोठ्या कालावधीनंतर कमबॅक करणाऱ्या अय्यरला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. अय्यरने गिलच्या मदतीने डावाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण हॅरिस रौफच्या भेदक माऱ्यापुढे अय्यरचा टिकाव लागला नाही. हॅरिस रौफच्या चेंडूवर अय्यरने कव्हरवर एक चौकार ठोकला पण चेंडूचा इतका वेग होता की बॅट तुटली. त्यामुळे श्रेयस अय्यर याला बॅट बदलावी लागली. अय्यर चांगला लयीत दिसत होता, पण हॅरिस रौफ याने त्याला तंबूत धाडले. बॅट बदलल्यानंतर श्रेयस अय्यरला मात्र जास्त वेळ फलंदाजी करता आली नाही. 14 च्या वैयक्तिक धावसंख्येवर अय्यरला हारिस रौफने बाद केले. अय्यर जेव्हा पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात फखर जमानकडे झेल देऊन माघारी परतला.  भारताने 50 धावांच्या आतमध्ये तीन आघाडीच्या विकेट गमावल्या. 

आघाडीची फळी ढेपाळली -

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही संयमी फलंदाजी करत होते. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदी याने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहिन याने दुसरा धक्का दिला. शाहिन आफ्रिदीने विराट कोहली यालाही त्रिफाळाचीत बाद करत 140 कोटी भारतीयांचा हिरमोड केला.  रोहित शर्मा याने 22 चेंडूत 11 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. रोहित आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहिन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यर याने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. श्रेयस अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफ याने श्रेयस अयय्र याला फखर जमान याच्याकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यर याने 9 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. 

हार्दिक-इशान किशन यांनी डाव सावरला - 

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.  पाचव्या विकेटसाठी हार्दिक आणि इशान किशन यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली आहे. कठीण स्थितीत या दोघांनी भारताची धावसंख्या वाढवण्याचे काम केले. इशान किशन याने दमदार अर्धशतक झळकावले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget