IND vs PAK : इरफान पठाणने निवडला टीम इंडियाचा संघ, पाहा कोण कोणते खेळाडू?
IND vs PAK, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
IND vs PAK, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघाने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या प्लेईंग 11 ची घोषणा केली. नेपाळविरोधातील विजयी संघ पाकिस्तानविरोधात उतरणार असल्याचे पीसीबीने ट्वीट करत सांगितले होते. पाकिस्तानने नेपाळविरोधात 238 धावांनी विराट विजय मिळवला होता. विराट विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. पाकिस्तानविरोधात भारताचे कोणते 11 शिलेदार मैदानात उतरणार ? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने आपली प्लेईंग 11 जाहीर केली आहे.
केएल राहुल पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नसल्यामुळे ईशान किशन याचे प्लेईंग 11 मधील स्थान निश्चित मानले जातेय. पण ईशान किशन कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार ? याबाबत सस्पेन्स कायम आहे. ईशान किशान सलामीला खेळणार की पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार? हे सामन्यावेळीच समजेल. इरफाण पठाण याने आपल्या प्लेईंग 11 मध्ये ईशान किशन याच्या शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांना स्थान दिलेय. इरफान पठाण याने आपल्या प्लेईंग 11 मध्ये सूर्यकुमार यादव याला स्थान दिले नाही. इरफान पाठण याने श्रेयस अय्यर याला पसंती दर्शवली आहे. इरफान पठाण याने ट्वीट करत आपल्या प्लईंग 11 बद्दल माहिती दिली. त्याशिवाय टीम इंडियाची प्लेईंग 11 कदाचीत वेगळी असू शकते, असेही त्याने सांगितले.
इरफान पाठण याने आपल्या प्लेईंग 11 मध्ये भारताच्या तीन प्रमुख गोलंदाजांना स्थान दिलेय. इरफान पठाण याने आपल्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी या तिन्हीही गोलंदाजांना स्थान दिलेय. त्याशिवाय अष्टपैलू खेळाडूमध्ये इरफान पठाण याने हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांना स्थान दिलेय. तर कुलदीप यादव याला फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान दिलेय.
इरफान पठाण याने निवडेली टीम इंडियाची प्लेईंग 11
रोहित शर्मा, शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह
Looking at the conditions here in candy this is my playing 11. The actual playing 11 will be different I think.
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 2, 2023
1) Rohit
2)Gill
3) Ishan
4) Virat
5) Shreyas
6)Jadeja
7) Hardik
8)kuldeep
9) Shami
10)Bumrah
11) Siraj
Will explain more in the pre show of the game. #INDvPAK
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2019 नंतर एकदिवसीय सामना होत आहे. 2019 च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. चार वर्षांनतर दोन्ही संघ आमनेसामने असतील. या संघात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या कमबॅकमुळे टीम इंडियाची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. त्याशिवाय श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे मध्यक्रमही मजबूत झाला आहे. आज होणारा हायहोल्टेज सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.