ICC Review Ricky Ponting’s first five players for World T20I XI: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं (Ricky Ponting) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टॉप 5 खेळाडूंची निवड केलीय. तीन वेळा विश्वचषक विजेत्या कर्णधारानं या टॉप 5 खेळाडूंच्या यादीत दोन भारतीयांचाही समावेश केलाय. याशिवाय त्यानं पाकिस्तान, इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी एक खेळाडूला स्थान दिलंय. पॉन्टिंगच्या टॉप 5 यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) समावेश आहे.
ट्वीट-
दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह आशिया चषक स्पर्धतून बाहेर
दरम्यान, दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. तर, हार्दिक पांड्यानं पाकिस्तानविरुद्धच्या गट टप्प्यातील सामन्यात त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला विजय मिळवून दिला. मात्र, सुपर 4 सामन्यात पांड्या पाकिस्तानविरुद्ध खातं न उघडताच माघारी परतला होता.
रिकी पाँटिंगच्या टी-20 टॉप 5 खेळाडूंची यादी
रिकी पाँटिंगनं अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खानला (Rashid Khan) टॉप 5 खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवलं आहे. रशीद हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्यानं 69 आंतरराष्ट्रीय सामन्यात 116 विकेट्स घेतले आहेत. यानंतर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर (Babar Azam) आझमची निवड करण्यात आली आहे. जो सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. याशिवाय भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तिसऱ्या आणि इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाँटिंगच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
आशिया चषकात कोणता संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन?
आशिया चषक पहिल्यांदा 1984 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतानं सर्वाधिक सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. तर, दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे. जे पाच वेळा चॅम्पियन ठरले आहेत. पाकिस्ताननं दोन वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. भारत एकमेव संघ आहे, ज्याने आशिया चषकाच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये खिताब जिंकलाय.
हे देखील वाचा-