IND vs NZ Live Score Updates: न्यूझीलंडसमोर 398 धावांचे आव्हान, विराट-अय्यरची शतके

IND vs NZ World Cup 2023 Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.  हीच नाणेफेक या सामन्याचा विजेता ठरवणार आहे

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 15 Nov 2023 10:27 PM
भारताचा न्यूझीलंडवर 71 धावांनी विजय

भारताचा न्यूझीलंडवर 71 धावांनी विजय... शामीच्या सात विकेट

भारत विजयापासून एक पाऊल दूर

मोहम्मद शामीने न्यूझीलंडला नववा धक्का दिला. भारत विजयापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

बुमराहला एक विकेट

जसप्रीत बुमराहने 10 षटकात 64 धावा खर्च केल्या अन् एक विकेट घेतली. त्याशिवाय त्याने एक षटक निर्धाव फेकले. 

आठवा धक्का

सिराजला विकेट मिळाली.... न्यूझीलंडला आठवा धक्का

मोहम्मद शामीचा पंच, न्यूझीलंडला दिला सातवा धक्का

विश्वचषकात तिसऱ्यांदा शामीने पाच विकेट्स घेतल्या. डॅरेल मिचेल याला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

जाडेजाला विकेट नाही

रविंद्र जाडेजाला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. जाडेजाने 10 षटकात 63 धावा खर्च केल्या. जाडेजाने फिल्डिंगमध्ये दोन जबराट झेल घेतले.

कुलदीपचा स्पेल संपला

कुलदीप यादवने 10 षटकात 55 धावा खर्च करत एका फलंदाजाला तंबूत धाडले. कुलदीप यादवने मार्क चॅम्पमन याला तंबूत पाठवले. 

न्यूझीलंडला सहावा धक्का

कुलदीप यादवने दिला न्यूझीलंडला सहावा धक्का... जाडेजाने पुन्हा घेतली विकेट

ग्लेन फिलिप्स तंबूत

जसप्रीत बुमराहने धोकादायक ग्लेन फिलिप्सला पाठवले तंबूत.... जाडेजाने घेतला जबराट झेल. न्यूझीलंड पाच बाद 295 धावा

90 चेंडूत 174 धावांची गरज

न्यूझीलंडला 90 चेंडूत 174 धावांची गरज... भारताला सहा विकेट्सची गरज आहे. 

डॅरेल मिचेल याला क्रॅम्प

डॅरेल मिचेल याला क्रॅम्पचा त्रास जाणवू लागलाय. त्याला धावतानाही त्रास होतोय. 

न्यूझीलंडला लागोपाठ दोन धक्के

मोहम्मद शामीने एकाच षटकात न्यूझीलंडला दोन धक्के दिले. विल्यमसननंतर लॅथमही बाद... न्यूझीलंड 4 बाद 220 धावा

भारताला तिसरे यश

मोहम्मद शामीने केन विल्यमसन याला बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. विल्यमसन याने 69 धावांची खेळी केली.

डॅरेल मिचेलचे शतक

डॅरेल मिचेल याने 85 चेंडूत शतक ठोकले. षटकार आणि चौकारांची बरसात करत मिचेल याने शतक ठोकले.

न्यूझीलंडचं द्विशतक

डॅरेल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी तगडी झुंज दिली. 30 षटकात न्यूझीलंडचे द्विशतक फलकावर लागले.

विल्यमसनला पुन्हा जिवनदान

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोहम्मद शामीने सोपा झेल सोडला. केन विल्यमसन 53 धावांवर खेळतोय.

केन विल्यमसनचं अर्धशतक

केन विल्यमसनने 58 चेंडूत अर्धशतक ठोकले.

न्यूझीलंडचं फाईटबॅक

भारताच्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने जबराट फाईटबॅक दिलेय.  विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी शतकी भागिदारी केली. 

विल्यमसनची फटकेबाजी सुरु

सलामीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांची फटकेबाजी सुुर झाली आहे. 

शामी ऑ फायर

शामीने न्यूझीलंडला दिला दुसरा धक्का... रचिन रविंद्रला केले बाद

मोहम्मद शामीचा न्यूझीलंडला तडाखा

मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर डेवॉन कॉनवेला बाद केले. न्यूझीलंडला पहिला धक्का

न्यझीलंडची फलंदाजी सुरु

न्यझीलंडची फलंदाजी सुरु झाली.. कॉनवे  आणि रचिनची सावध सुरुवात

भारताची 397 धावांपर्यंत मजल

भारताची 397 धावांपर्यंत मजल... राहुलचा जबराट फिनिशिंग टच

सूर्या आला सूर्या गेला

सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात फक्त एक धाव काढून सूर्यकुमार यादव बाद झाला.

भारताला तिसरा धक्का

श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 105 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. 

अय्यरचा शतकी धमाका

श्रेयस अय्यरची शतकी खेळी... 67 चेंडूमध्ये अय्यरने शतकाला गवसणी घातली. विश्वचषकातील अय्यरचे दुसरे शतक ... भारत दोन बाद 361 धावा

भारताला मोठा धक्का

50 व्या शतकानंतर विराट कोहली बाद झाला. 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली.

विराट कोहलीचे शतकाचे अर्धशतक

विराट कोहलीने 106 चेंडूत शतक ठोकले. वानखेडेवर विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला. 

भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

विराट कोहलीची शतकाकडे वाटचाल तर भारत 400 धावांकडे वाटचाल करत आहे. 40 षटकानंतर भारताने 290 धावांचा पल्ला पार केला आहे. 

शतकाजवळ विराटला जीवदान

93 धावांवर खेळणाऱ्या विराट कोहलीला किवी खेळाडूंनी जीवदान दिले. विराट कोहली फायदा घेणार का ?

गुड न्यूज

अय्यरचे अर्धशतक

श्रेयस अय्यरचे वादळी अर्धशतक... 35 चेंडूत ठोकल्या 50 धावा

भारताचा 250 धावांचा टप्पा पार

भारताचा 250 धावांचा टप्पा पार... विराटची शतकाकडे वाटचाल... 

विराट कोहलीचं 78 वे अर्धशतक

भारताची 350 धावांकडे वाटचाल

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. भारताचा डाव सावरला... 

शुभमन गिलने मैदान सोडले

क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिलने मैदान सोडले... अय्यर मैदानावर आला.. भारत एक बाद 165 धावा

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : विराट-गिलची शानदार फलंदाजी

विराट कोहली आणि शुभमन गिल यांची शानदार फलंदाजी सुरु आहे. भारताने 20 षटकानंतर एक बाद 150 धावा केल्या आहेत. 

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : वानखेडेवर कलाकारांची मायंदाळी

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : अर्धशतकी भागिदारी

शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यामध्ये अर्धशतकी भागिदारी झाली.  रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याची वादळी फलंदाजी

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : शुभमन गिलचं अर्धशतक

रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिलची वादळी फलंदाजी.... 41 चेंडूत ठोकले अर्धशतक... विराट आणि गिल मैदानात... भारत एक बाद 118 धावा

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : भारताला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसलाय. टीम साऊदीचा चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात रोहित बाद झाला. केन विल्यमसन याने जबरदस्त झेल घेतला. रोहित शर्मा 29 चेंडूमध्ये 47 धावांचे योगदान दिले. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. 

Rohit Sharma Most Sixes Record : रोहितचा झंझावात, आता युनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम केला ध्वस्त

Rohit Sharma Most Sixes Record : भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात झंझावत सुरुवात केली. ट्रेंट बोल्ट आणि साऊदी या आघाडीच्या गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्माने वानखेडे मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने विश्वचषकात 50 षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे. विश्वचषकात आतापर्यंत एकाही फलंदाजाला 50 षटकार मारता आलेले नाहीत. ख्रिस गेल याने याआधी विश्वचषकात 49 षटकार लगावले होते. रोहितच्या वादळात युनिवर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम ध्वस्त झाला. आता विश्वचषकात सर्वाधिक षटकार  मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झालाय. 

रोहितची वादळी सुरुवात

रोहित शर्माने बोल्ट आणि साऊदीची धुलाई केली. 4 षटकात 38 धावा केल्या वसूल

रोहितचे इरादे स्पष्ट

रोहित शर्माने ट्रेंट बोल्टला लागोपाठ दोन चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. बोल्टच्या पहिल्याच षटकात रोहितने वसूल केल्या 10 धावा

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले आहेत. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट गोलंदाजीसाठी तयार...

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final न्यूझीलंडची प्लेईंग 11

 


डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, केन विलियमसन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिचेल सेंटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: भारताची प्लेईंग 11 :

 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: रणबीर सिंह स्टेडियममध्ये पोहचला

IND vs NZ Semi-Final : वानखेडे स्टेडिअमच्या खेळपट्टीमध्ये बदल

IND vs NZ Semi-Final Pitch Update: भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या उपांत्य सामन्याच्या निमित्तानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकातला पाचवा सामना खेळवण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सेमीफायनलसाठी वानखेडेची खेळपट्टी बदलण्यात आली आहे. उपांत्य सामन्यासाठी वानखेडे स्टेडिअमची खेळपट्ट संथ असेल, असे बोलले जात आहे. संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या पीच क्यूरेटरला वानखेडे स्टेडिअमच्या खेळपट्टीवरून गवत काढण्यास सांगितलेय. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यातील खेळपट्टीवर गवत कमी असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कमी धावसंख्या होईल असे वाटतेय. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: भारतीय संघ स्टेडियमकडे रवाना

भारतीय संघ स्टेडियमकडे रवाना... थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final:

खेळपट्टीवरील गवत काढल्यामुळे खेळपट्टी संथ होईल. त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरेल. रिपोर्ट्सनुसार, खेळपट्टी संथ असेल पण फिरकीला मदत करणारी नसेल. संघाच्या मागणीनंतर खेळपट्टीवरील गवत काढण्यात आलेय. दरम्यान, मागील काही वर्षांत टीम इंडियाने घरच्या मैदानावर संथ खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली आहे. विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापनाने आपले सामने संथ खेळपट्टीवर खेळवण्याची विनंती केली होती. आता सेमीफायनलसाठी संथ खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. यंदाच्या विश्वचषकात खेळपट्ट्या जशा होत्या, तशी ही खेळपट्टी नसेल. या खेळपट्टीवर धावांचासाठी संघर्ष कारावा लागू शकतो. दुसऱ्या डावात खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत कमी मिळेल. 


वानखेडेच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलचा सामना होणाऱ्या खेळपट्टीवरुन गवत काढण्यात आलेय.  म्हणजेच, वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांना येथे जास्त मदत मिळेल. खेळपट्टीवर चेंडू अतिरिक्त वळणार नाही, पण अचूक टप्प्यावर मारा केल्यास फिरकी प्रभावी ठेरल. 

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग 11 - 

डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, केन विलियमसन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिचेल सेंटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट.

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: भारताची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final: खेळपट्टी कशी असेल - 







टीम इंडियाच्या खांद्यावर देशभरातील अब्जावधी लोकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. अशातच रोहितसेना प्रचंड मोठ्या दबावाखाली असणार हे मात्र नक्की. पण अशातच कर्मधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनाही विश्वास आहे की, टीम इंडिया देशवासियांची मनं अजिबात मोडणार नाही. रोहितनं नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता करतोय. वानखेडेच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ फ्लडलाईटमध्ये झटपट विकेट गमावत असल्याचं आपण यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं आहे. कारण नवीन चेंडूला जबरदस्त स्विंग मिळतो. टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे गोलंदाज नव्या चेंडूनं खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यावर बरंच काही अवलंबून असेल.

पार्श्वभूमी

IND vs NZ Live Score Updates, 1st Semi-Final : विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. या सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. भारतानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात  नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उभय संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.  हीच नाणेफेक या सामन्याचा विजेता ठरवणार आहे. होय... वानखेडेवरील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिल्यास नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचे पारडे जड असल्याचे दिसतेय. 


वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकाचे चार सामने झाले आहेत. चारही सामने डे नाइट होते. या चारही सामन्यात परिस्थिती एकसारखी राहिली आहे. चारही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झालाय. त्यातुलनेत दुसऱ्या डावात फलंदाजी करताना संघर्ष करायला लागल्याचे दिसतेय. दुसऱ्या डावात पहिल्या 20 षटकं प्रत्येक संघासाठी खराब राहिली आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये वानखेडे स्टेडियम पहिल्या तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर धावांचा पाठलाग करणारा संघ स्वस्तात ढेर झाला. 


भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या उपांत्य सामन्याच्या निमित्तानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकातला पाचवा सामना खेळवण्यात येत आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळं नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ वानखेडेवर पहिल्यांदा फलंदाजी घेणं पसंत करतो. विश्वचषकाच्या साखळीत दक्षिण आफ्रिकेनं वानखेडेवरच्या पहिल्या दोन आणि भारतानं तिसऱ्या सामन्यात पहिली फलंदाजी करून तब्बल साडेतीनशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला होता. तिन्ही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला त्या आव्हानाचा पाठलाग करता आला नव्हता. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्ताननं दिलेल्या 292 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकानं ऑस्ट्रेलियानं ती किमया साधता आली होती. पण ऑस्टेलियाचे सात फलंदाज फक्त 91 धावांत तंबूत परतले होते. 









आतापर्यंत झालेल्या चार सामन्याप्रमाणेच आजचीही खेळपट्टी राहील असा अंदाज आहे. म्हणजेच, नाणेफेक जिंका, सामने जिंका.. हा फॉर्मुला झालाय. म्हणजेच, वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करतो. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पहिल्या 20 षटकात संघर्ष करावा लागतो. फ्लड लाईट्समध्ये चेंडू अधिक स्विंग होते, त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरते.  पण पहिली 20 षटकं खेळून काढल्यास पुढील 30 षटकांत धावांचा पाऊस पडतो. 


टीम इंडियाच्या खांद्यावर देशभरातील अब्जावधी लोकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. अशातच रोहितसेना प्रचंड मोठ्या दबावाखाली असणार हे मात्र नक्की. पण अशातच कर्मधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनाही विश्वास आहे की, टीम इंडिया देशवासियांची मनं अजिबात मोडणार नाही. रोहितनं नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता करतोय. वानखेडेच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ फ्लडलाईटमध्ये झटपट विकेट गमावत असल्याचं आपण यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं आहे. कारण नवीन चेंडूला जबरदस्त स्विंग मिळतो. टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे गोलंदाज नव्या चेंडूनं खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यावर बरंच काही अवलंबून असेल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.