एक्स्प्लोर

IND vs NZ, T20 World Cup 2022: पावसाचा खोळंबा! भारत- न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना अखेर रद्द, चाहते निराश

IND vs NZ T20 Warm-Up Match: ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडयमवर हा सामना खेळला जाणार होता.

IND vs NZ T20 Warm-Up Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडयमवर आज खेळला जाणारा सराव सामना पावसामुळं रद्द करण्यात आलाय. भारतीय वेळेनुसार, हा सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरु होणार होता. तर, यापूर्वी अर्धातास दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी दुपारी 1 वाजता मैदानात उतरणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाला. अखेर भारत- न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिलीय.


बीसीसीआयचं ट्वीट-

 

भारत- न्यूझीलंड सामन्यात पावसाचा गोंधळ
भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ब्रिस्बेन येथे पावसाला सुरुवात झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली होती. तसेच 5-5 षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम जाहीर केला होता. जो स्थानिक वेळेनुसार  रात्री 8:46 (भारतीय वेळेनुसार दुपारी 4.16) होता. तसेच पाऊस थांबल्यास हा सामना 5-5 षटकांचा खेळवला जाईल, अशीही माहिती बीसीसीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. 

ट्वीट-

पहिल्या सराव सामन्यात भारताचा 6 धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात आलेल्या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारत 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सराव सामना रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे. यानंतर भारत टी-20 विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. मागच्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्यात पराभवाला समारे जावा लागलं होतं. या सामन्यात भारताला 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget