IND vs NZ Head to Head Records: भारत- न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज, हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर
India Tour Of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) खेळला जाणार आहे
India Tour Of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (30 नोव्हेंबर 2022) खेळला जाणार आहे. क्राइस्टचर्चमधील (Christchurch) हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) स्टेडियमवर दोन्ही संघात लढत होणार आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, केन विल्यमसन (Kane Williamson) न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत किवीज संघ 1-0 नं आघाडीवर आहे.
भारत-न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 307 धावांचा पाठलाग करताना टॉम लॅथमनं नाबाद 145 धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या डावातील 13 व्या षटकात पावसाला सुरुवात झाली आणि सामना रद्द करण्यात आला.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 112 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यात आले. यापैकी 55 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडच्या संघाला 50 सामन्यात विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडच्या मैदानावर भारताला 26 वेळा पराभव स्वीकारावा लागला होता.
कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी टीम साऊथी मैदानात उतरणार
टीम साऊथीनं टीम इंडियाविरुद्धच्या 23 एकदिवसीय सामन्यात 37.60 च्या सरासरीनं 33 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान, टिम साऊथीची इकोनॉमी 6.23 आहे. त्याचबरोबर कपिल देवनं न्यूझीलंडविरुद्ध 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.60 च्या सरासरीनं 33 विकेट घेतल्या आहेत. अशा प्रकारे टीम साऊथीनं कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. एक विकेट घेतल्यानंतर टीम साऊथी दोन्ही देशांमधील एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरेल. या यादीत जवागल श्रीनाथ पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ट्वीट-
Preps 🔛 #TeamIndia gear up for the 3⃣rd #NZvIND ODI in Christchurch 👌 👌 pic.twitter.com/2nkFpFNi77
— BCCI (@BCCI) November 29, 2022
हे देखील वाचा-