IND vs NZ: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने जाहीर केला संघ; दोन अडचणीही सांगितल्या, पाहा A टू Z माहिती
IND vs NZ: भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे.
IND vs NZ: भारतीय संघाने अलीकडेच मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. टीम इंडियाने बांगलादेशचा मालिकेत 2-0 असा पराभव केला. आता टीम इंडिया 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand Test Match) पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीचा संघ न्यूझीलंडने जाहीर केला आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन उशिराने टीम इंडियाला पोहोचेल. याआधी, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान केन विल्यमसनला मांडीचा त्रास झाला होता. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात सामील होण्यासाठी त्याला थोडावेळ लागणार असल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे. तसेच मायकेल ब्रेसवेल फक्त पहिला कसोटी सामना खेळणार आहे. तर ईश सोढी दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडने मार्क चॅम्पमनचा देखील कसोटी संघात समावेश केला आहे.
भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ-
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोढी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग
NEW ZEALAND SQUAD FOR THE TEST SERIES vs INDIA:
— Johns. (@CricCrazyJohns) October 9, 2024
Latham (C), Blundell, Bracewell, Chapman (Cover), Conway, Henry, Daryl, O’Rourke, Ajaz , Phillips, Rachin, Santner, Sears, Sodhi, Southee, Williamson, Young.
- Williamson is Doubtful for the First Test. pic.twitter.com/KfeE3Jdj5W
भारत-न्यूझीलंडची मालिका कशी असेल?
पहिला कसोटी सामना- 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा कसोटी सामना-24 ते 28 ऑक्टोबर, पुणे
तिसरा कसोटी सामना- 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई
WTC च्या गुणतालिकेची काय स्थिती?
बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर डब्ल्यूटीसीच्या फायनलमधील स्थान टीम इंडियाने जवळपास निश्चित केलं आहे. डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत सध्या टीम इंडिया 74.24% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचे 55.56% गुण झाले आहेत. तर इंग्लंडचा संघ 42.19% गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण अफ्रिका 38.89% गुणांसह पाचव्या आणि न्यूझीलंड 37.50% टक्क्यांसह सहाव्या स्थानावर आहे.