IND vs NZ 3rd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर (Eden Garden Stadium) हा सामना पार पडणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातलीय. भारतीय संघाचं अखेरच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत निर्वादित वर्चस्व राखण्याचं लक्ष असेल. भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद मिळवलेल्या रोहित शर्माकडं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचण्याची संधी उपलब्ध झालीय. या विक्रमातून रोहित शर्मा केवेळ 87 धावा दूर आहे.
रोहित शर्मानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 3 हजार141 धावा केल्या आहेत. रोहित टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार विराट कोहली 3 हजार 227 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटचा विक्रम मोडण्यापासून रोहित शर्मा केवळ 87 धावा दूर आहे. या मालिकेत रोहित शर्मानं चांगली कामगिरी केलीय. रोहित शर्मानं आजच्या सामन्यात 87 धावा केल्यास टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचेल.
भारताविरुद्ध मागच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलनं आक्रमक फलंदाजी करीत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर केलाय. यापूर्वी, या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी होता. मार्टिन गप्टिल 3 हजार 248 धावांसह टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत अव्वल स्थानी पोहचलाय. मार्टिन गप्टिलनं न्यूझीलंडसाठी 111 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं 32 च्या सरासरीनं आणि 136 च्या स्ट्राईक रेटनं 3 हजार 248 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा समावेश आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे.
विराटनं टी-20 क्रिकेटमधील 95 सामन्यांतील 87 डावात 3 हजार 227 धावा केल्या. त्यानं 52 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. मात्र, विराटला टी-20 क्रिकेटमध्ये एकही शतक लगावता आलं नाही. त्याच्या नावावर 29 अर्धशतकांची नोंद आहे.
रोहित शर्मानं भारताकडून 118 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 33 च्या सरासरीनं आणि 139 च्या स्ट्राईक रेटनं 3 हजार 141 धावा केल्या आहेत. रोहितनं टी-20 मध्येही चार शतकं झळकावली. टी-20 क्रिकेटमध्ये षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या यादीत तो गप्टिलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 147 षटकार मारले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-