Travis Head WTC Final 2025 : 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी पहिले सत्र काही खास राहिले नाही, आफ्रिकन गोलंदाजांनी सुरुवातीला फायदा घेत ऑस्ट्रेलियाला दोन झटपट धक्के दिले. ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा खाते उघडू शकला नाही आणि कॅमेरॉन ग्रीन 4 धावा करून आऊट झाला.ज्यानंतर स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडची विकेटही गमावली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठा धोका ट्रॅव्हिस हेड मानला जात होता, ज्याने आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात दोन शतके झळकावली आहेत. पण तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही खास कामगिरी करू शकला नाही. यानंतर, ट्रॅव्हिस हेड आणि रोहित शर्मा यांना जोडून मीम्स बनवले जाऊ लागले.
ट्रॅव्हिस हेडची विकेट अन् मीम्सचा पाऊस...
ट्रॅव्हिस हेडची विकेट पडताच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भारतीय चाहत्यांनी मीम्सचा अक्षरशः पूर आणला. अनेकांनी पुन्हा "रोहित शर्मा"चं नाव घेतलं आणि लिहिलं, नो रोहित शर्मा, नो पार्टी...! तर सोशल मीडियावरील अशाच एका मीममध्ये, ट्रॅव्हिस हेड असे म्हणत असल्याचे दाखवण्यात आले आहे की, 'जर रोहित भाईची टीम अंतिम फेरीत असती, तर त्याने किमान 150 धावा केल्या असत्या.'
ट्रॅव्हिस हेडसोबत पहिल्यांदाच असं घडलं...
ट्रॅव्हिस हेड त्याच्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. त्याने यापूर्वी 2023 मध्ये डब्ल्यूटीसी फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप फायनल खेळला होता. हे दोन्ही सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळले गेले होते.
ट्रॅव्हिस हेडने आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध 137 धावा केल्या. 2023 मध्येच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये त्याने 163 आणि 18 धावांच्या खेळी खेळली होती. ट्रॅव्हिस हेडच्या या खेळींमुळे भारत विजेतेपदापासून वंचित राहिला, पण आयसीसी अंतिम सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं की ट्रॅव्हिस हेडने स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.
हे ही वाचा -