
अफगाण फौजेला पाणी पाजल्यानंतर इंग्लंडचा नंबर, पाहा वेळापत्रक अन् संघ
IND vs ENG : अफगाण फौजेला हरवल्यानंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे.

IND vs ENG : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत भारतीय संघाने निर्वादीत वर्चस्व गाजवलं. अफगाण फौजेला हरवल्यानंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 25 ते 29 जानेवारी रोजी पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर 2 ते 6 फेब्रुवारी यादरम्यान विशाखापट्टणम येथे दुसरा सामना होणार आहे. राजकोटमध्ये तिसरा, रांचीमध्ये चौथा तर धरमशाला येथे सात ते 11 मार्च यादरम्यान पाचवा कसोटी सामना होणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या ताफ्यात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला लगेच तयारी सुरु करावी लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 20 जानेवारीपर्यंत टीम इंडिया हैदराबादमध्ये दाखल होणार आहे. सामन्याआधी चार दिवसांचा सराव होणार आहे.
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.
पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून होणार आहे. दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टणम येथे होणार आहे. राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. रांचीमध्ये 23 फेब्रुवारीपासून चौथा कसोटी सामना होणार आहे. अखेरचा कसोटी सामना धरमशाला मैदानावर सात मार्चपासून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
