IND Vs ENG 4th Test Match : अखेरच्या दोन सामन्यात वर्चस्व गाजवणारा भारत पुन्हा एकदा गुरुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने अंतिम कसोटी ड्रॉ जरी केली तरी जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात ते न्यूझीलंडशी सामना करतील. इंग्लंड आणि भारत यांच्यातील अंतिम सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.


अंतिम शर्यतीतून इंग्लंडचा संघ बाहेर पडला आहे. परंतु जर त्यांनी अंतिम कसोटी जिंकली तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियमशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर टाकतील. आणि टिम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. अशा सामन्यात ड्रॉ हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय असतो. मोटेराच्या नव्या खेळपट्टीवरील तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला गुलाबी बॉलवर खेळण्यास अनेक अडचणी आल्या आणि अवघ्या दोन दिवसातच भारताने 10 गडी राखून विजय मिळवला.


'या' वर्ल्ड रेकॉर्डपासून Virat Kohli केवळ एक शतक दूर; रिकी पॉटिंगलाही टाकणार मागे


डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या सरळ चेंडूंचा सामना करण्यास इंग्लंडच्या फलंदाजांना अडचण आली. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रोली यांना वाटते की चौथ्या कसोटी सामना शेवटच्या दोन सामन्यांसारखाच असेल. मात्र गुलाबी बॉलपेक्षा खेळपट्टीवर लाल बॉल जास्त वेगाने येत नाही. त्यामुळे शेवटचा समाना टीम इंडियासाठीसाठी तरी महत्वाचा असणार आहे. इंग्लंड संघासाठी या सामन्यात फारसा धोका नाही. या सामन्यात इंग्लंड विजयासह मालिका ड्रॉ करण्यावर भर देईल. मात्र भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोणातू हा सामना अत्यंत महत्वपूर्ण आहे.


अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी आतापर्यंत मालिकेत 42 विकेट घेतल्या आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजांनी पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 60 पैकी 49 विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटच्या सामन्यातही त्यांची ही कामगिरी कायम रहावी ही सर्व फॅन्सना आशा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत मालिकेत 296 धावा केल्या आहेत. तर अश्विनच्या नावे 176 धावा आहेत. अश्विनने चेपकच्या कठीण खेळपट्टीवर शतक ठोकले. रोहितशिवाय आतापर्यंत कोणताही भारतीय फलंदाज फिरकीपटू खेळपट्टीवर आत्मविश्वासाने खेळलेला दिसला नाही.


India Vs England | ...आणि ऋषभ पंतनं पंचांकडेच मागितले पैसे


अंतिम सामन्यात भारतीय संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविना मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत उमेश यादव पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. आता त्याच्यासोबत इशांत शर्मा असेल की मोहम्मद सिराज हे पाहावं लागेल.


विराटची अनोखी सेन्चुरी, इन्स्टावर 100 मिलियन फॉलोअर्स, एवढे चाहते असणारा जगातील एकमेव क्रिकेटर


संभाव्य संघ


भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, वृध्दिमान साहा, मयंक अगरवाल, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि लोकेश राहुल.


इंग्लंडः जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्रोली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.