नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभर आहे. आपल्या खेळण्याचा अंदाज, खेळातलं सातत्य यासह तो आपल्या स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असतो. मैदानावर त्यानं आजवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मैदानातील विक्रमांसह आता त्यानं सोशल मीडियावर देखील एक नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. 100 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे.


विराट कोहलीच्या या यशाबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो.





100 मिलिअन क्लबमध्ये आणखी कोण?
विराट कोहली हा जगातला एकमेव क्रिकेटर आहे ज्याचे इंस्टावर 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराटसह द रॉक ड्वेन जॉनसन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार, लियोनेल मेसी या क्लबमध्ये आहे. सोबतच सेलिब्रिटींमध्ये बेयॉन्से आणि एरियाना ग्रॅंड या क्लबमध्ये आहेत. खेळाडूंच्या यादीमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो नंबर एक वर अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी दुसर्‍या क्रमांकावर आणि ब्राझीलचा नेमार तिसर्‍या स्थानावर आहे.


विराट कोहलीला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी भरपूर पैसे देखील मिळतात. इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील विराटचं नाव आहे.