India Vs England भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये अहमदाबाद येथे तिसरा कसोटी सामना (Ind Vs Eng 3rd Test) खेळला गेला. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या दमदार फिरकी गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघानं अवघ्या दोन दिवसांमध्येच पाहुण्या इंग्लंडच्या संघाचा पराभव केला. भारतीय संघानं या सामन्यात 10 विकेटनं दणदणीत विजय मिळवला.


दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय खेळाडूंनी क्रीडा रसिकांची मनं जिंकली त्यातलंच एक नाव म्हणजे ऋषभ पंत. या सामन्यात पंतनं त्याच्या अनोख्या अंदाजात क्रीडारसिकांचं मनोरंजन केलं. याच सामन्यातील त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.


एकिकडे पंतच्या यष्टीरक्षणाची प्रशंसा केली जात असतानाच दुसरीकडे त्याचा आणखी एक अंदाजही प्रशंसेस पात्र ठरत आहे. हा अंदाज म्हणजे त्यानं कसोटी सामन्यादरम्यान थेट पंचांकडेच पैसे मागितल्याचं पाहायला मिळालं. अर्थात त्याचा हा अंदाज मजामस्तीमध्ये होता.


'या' वर्ल्ड रेकॉर्डपासून Virat Kohli केवळ एक शतक दूर; रिकी पॉटिंगलाही टाकणार मागे




नेमकं काय झालं....?


सामना सुरु असतेवेळी स्टंपवर असणाऱ्या बेल्स पडल्या. त्याचवेळी पंच अनिल चौधरी यांची त्यावर नजर पडली आणि त्यांनी पंतला त्या नीट ठेवण्यास सांगितलं. ऋषभनं त्या नीट ठेवल्या खऱ्या, पण त्यानंतर मोठ्या विनोदी अंदाजात एकादा लहान मुलगा एखादं काम केल्यावर ज्याप्रमाणं त्याचं बक्षीस मागतो, त्याच अंदाजात ऋषभनं पंचांकडे, 'मेरे पैसे दो...' असं म्हणत आगळीवेगळीच मागणी केली. त्याचा हा अंदाज पाहून तिथं मैदानात असणाऱ्या भारतीय खेळाडूंनाही हसू आवरता आलं नाही.