Virat Kohli Word Record | भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना चार मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. या सामन्यात विराट कोहलीने जर शतक झळकावलं तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड विराट आपल्या नावे करणार आहे. सध्या हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे.
कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये दोन अर्धशतकं झळकावली आहेत. परंतु, एकही शतक मात्र तो झळकावू शकला नाही. सध्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने आघाडी मिळवली आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा विजय होईल.
2019 नंतर विराटचं एकही शतक नाही
विराट कोहलीने सर्वात शेवटी 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये बांग्लादेशच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या नाईट टेस्टमध्ये शतक झळकावण्यात आलं होतं. त्यानंतर कोहील 11 डावांत एकही शतक झळकावू शकलेला नाही.
या कसोटी सामन्यात कोहली मोडू शकणार रिकी पॉटिंगचा रेकॉर्ड?
जर कोहली मोटेरा टेस्टमध्ये शतक लगावू शकला, तर तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे करेल. हा रेकॉर्ड आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून कोहलीच्या नावे आतापर्यंत 41 शतक आहेत. हे कोहलीचं 42वं शकत आहे. तसेच टेस्टमध्ये कोहलीचं हे 28वं शतक असेल.
कोहली आधुनिक युगातील हिरो : स्टीव्ह वॉ
यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज स्टीव वॉचं म्हणणं आहे की विराट कोहली 'आधुनिक युगाचा हिरो' प्रमाणे आहे. जे 'भारताच्या नव्या पिढिचं' प्रतिनिधित्व करणार आहे. जो काहीही अशक्य नाही, या मानसिकतेसोबत सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी तयार आहे.
विराटची अनोखी सेन्चुरी, इन्स्टावर 100 मिलियन फॉलोअर्स
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभर आहे. आपल्या खेळण्याचा अंदाज, खेळातलं सातत्य यासह तो आपल्या स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असतो. मैदानावर त्यानं आजवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मैदानातील विक्रमांसह आता त्यानं सोशल मीडियावर देखील एक नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. 100 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. विराट कोहलीच्या या यशाबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :