Vikram Rathoure On Sarfaraz Khan & Rajat Patidar : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने (IND vs ENG) भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. आता भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टनम येथे होणार आहे. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये नक्कीच बदल होणार आहे. पण प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार ? सरफराज खान, रजत पाटीदार (Sarfaraz Khan & Rajat Patidar) की वॉशिंगटन सुंदर यांच्यापैक कुणाची वर्णी लागणार ? प्लेईंग 11 मध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार? याचा तर्कवितर्क लावला जातोय. भारतीय संघाचे फलंदाजी कोच विक्रम राठौड यांनी याचं उत्तर दिलेय. 


सरफराज खान आणि रजत पाटीदार यांच्या बॅटिंगवर काय म्हणाले कोच ?


टीम इंडियाचे फलंदाजी कोच विक्रम राठौड यांच्या मते, सरफराज खान आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाची निवड करणं कठीण आहे. दोघेही शानदार खेळाडू आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रजत आणि सरफराज यांनी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर सरफराज खान आणि रजत पाटीदार दोघेही एक्सफॅक्टर ठरतील. दोघांपैकी एकाची निवड करणं सोपं नसेल.  


रोहित शर्मा आणि राहुल द्रविड घेणार निर्णय -


टीम इंडियाचे फलंदाजी कोच विक्रम राठौड म्हणाले की, "सरफराज खान आणि रजत पाटीदार दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड घेतील.  विशाखापट्टणमची खेळपट्टी पाहून प्लेईंग 11 ची निवड केली जाईल." विशाखापट्टणमच्या खेळपट्टीबाबत आताच अंदाज बांधणं कठीण आहे. पण फिरकीला मदत मिळू शकते. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतील, असे राठौड यांनी सांगितलं. दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यापैकी कुणाला संधी मिळतेय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


'या' खेळाडूंवर दुसऱ्या कसोटी सामन्याची धुरा


पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला विराट कोहली आणि मोहम्मद शामीची उणीव भासली. या दोघांची भरपाई कोणी करू शकलं नाही. पण आता दुसऱ्या कसोटीत जाडेजा आणि केएल राहुलच्या जागी रजत पाटीदार आणि सर्फराज अहमद यांना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकतं. तर खराब कामगिरीशी झगडत असलेल्या शुभमन गिलला वगळलं जाऊ शकतं. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय क्रिकेट संघ रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव या तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत होऊ शकते आणि इंग्लंडला भारी पडू शकते. 


दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार. 


आणखी वाचा :


India Vs England 2nd Test: टीम इंडिया अडचणीत! 4 दिग्गजांशिवाय टीम इंडिया खेळणार इंग्लंडविरोधातील दुसरी कसोटी