India vs England Toss Update : इंग्लंडच्या बर्मिगहममधील एजबेस्टन मैदानात पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी दोन्ही संघानी अंतिम 11 मध्ये महत्त्वाचे बदल केले असून भारतीय संघात चार दिग्गज खेळाडू परतले असून इंग्लंड संघानेही दोन बदल केले आहेत.
पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी विजय मिळवल्यानंतर आज दुसरा सामना खेळवला जात आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहमधील एजबेस्टन (Edgbaston) मैदानात सामना खेळवला जात असून याठिकाणची खेळपट्टी (Pitch Report) फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी फायद्याची असल्याने एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
आज होणाऱ्या सामन्यात इंग्लंडने संघात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांनी डेविड विली आणि गेसन रिचर्ज ग्लेसन यांना संघात घेत, टायमन मिल्स आणि टोप्ले यांना विश्रांती दिली आहे. दुसरीकडे भारतीय संघानेही चार बदल केले आहेत. यावेळी भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅथ्यू पार्किंसन आणि रिचर्ड ग्लीसन
हे देखील वाचा-
- Watch : हॉकी विश्वचषक सामन्यादरम्यान महिला खेळाडूची बॉयफ्रेंडला किस, भर मैदानात केलं प्रपोज, पाहा VIDEO
- Wimbledon 2022 Final: नोवाक जोकोविचला रॉजर फेडररचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी !
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक