IND Vs SA 2nd T20 Playing 11 : दक्षिण अफ्रिकाने पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा सात गड्यांनी पराभव केला. दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. हे पाहता दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. कटक येथे होणाऱ्या टी 20 सामन्यात भारतीय गोलंदाजीमध्ये बदलाची शक्यता आहे. अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हर्षल पटेल याची गोलंदाजी फोडून काढली. हर्षल पटेलच्या एका षटकात आफ्रिकाने 22 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यापैकी एकाला संधी मिळू शकते. अक्षर पटेल याच्या गोलंदाजीवरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी युवा रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती, अखेरच्या आठ षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तब्बल 110 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळो गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांची प्लेईंग 11 मधील जागा निश्चित मानली जात आहे. पॉवरप्लेच्या षटकात भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. तर पहिल्या षटकात महागडा ठरणाऱ्या आवेश खान याने अखेरच्या तीन षटकात टिचून मारा केला होता. अर्शदीप डेप्थ ओव्हरमध्ये चांगला पर्याय मानला जाऊ शकतो.
फलंदाजीत बदलाची शक्यता नाही -
पहिल्या टी 20 सामन्यात फलंदाजांनी आपलू भूमिका चोख बजावली होती. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सलामी दिली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनीही प्रभावी फलंदाजी केली होती. त्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.
कटक येथे होणाऱ्या टी 20 सामन्यातील संभावित प्लेईंग 11 - (India Playing 11 for 2nd T20): ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवि बिश्नोई.